Sunday, September 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

लाटेतही ‘हत्तुरें’चा ‘वैभव’ ठरला प्रभाग २५ चा ‘ब्रॅंड’

मामा' टायगर अभी जिंदा है !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 17, 2026
in सोलापूर
0
लाटेतही ‘हत्तुरें’चा ‘वैभव’ ठरला प्रभाग २५ चा ‘ब्रॅंड’
0
SHARES
327
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अटीतटीच्या लढतीत वैभव हत्तुरे यांनी राष्र्टवादीची राखली ‘शान’

सोलापूर .. सोलापूर
महानगरपालिका निवडणूकीत जुळे सोलापूरातील प्रभाग २५ मधून राष्र्टवादीचे वैभव हत्तुरे यांनी भाजपाच्या नागेश ताकमोगे यांचा २८९ मतांनी पराभव करून विकासाच्या जोरावर बाहुबली ठरले. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जुळे सोलापूरात भाजपाचा गड आला पण ताकमोगे यांच्या पराभवामुळे सिंह गेल्याची चर्चा सुरू आहे . श्रीशैल ‘मामां’च्या जनसंपर्कामुळे भाजपाच्या लाटेतही वैभव हत्तुरे यांनी राष्र्टवादीची खिंड लढवून विजय खेचून आणला . त्यामुळे मामांच्या रूपाने ‘टायगर अभी जिंदा है’ ! म्हणत कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला .
प्रभाग क्रमांक २५ मधून यापूर्वी वैभव हत्तुरे यांनी भाजपाचे नगरसेवक म्हणून कोट्यावधींची विकासकामे केली. प्रभागामधील जनतेशी सलोख्याचे संबंध ठेऊन अडचणीच्या काळात धावून गेले. २०२० च्या विधानसभा निवडणूकीत हत्तुरे वस्ती येथील श्रीशैल हत्तुरे ‘मामा’ यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाकडून वैभव हत्तुरे यांना नगरसेवक उमेदवारीचा ‘शब्द’ देण्यात आला . मात्र २०२५ च्या विधानसभा निवडणूकीत वैभव हत्तुरे यांनी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेऊन भाजपाकडून त्यांची उमेदवारीला कात्री लावण्यात आली. त्यामुळे हत्तुरे वस्ती परीसरात भाजपा विरोधात नाराजी होती. शिवाय त्यांच्याऐवजी भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने समर्थक नागेश ताकमोगे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने प्रभाग २५ मध्ये महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या प्रयत्नामुळे वैभव हत्तुरे यांना राष्र्टवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे निवडणूकीत जुळे सोलापूरात प्रभाग २५ ची ‘हाॅट’ मतदारसंघ म्हणून चर्चा होती. प्रचारादरम्यान मतदारांकडून हत्तुरे यांच्या विकासाचीही चर्चा झाली. मात्र केंद्रापासून ग्रामपंचायतपर्यंत भाजपची सत्ता व लाट असल्यामुळे निकालाकडे लक्ष लागून राहीली होती. ताकमोगे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून सर्व ताकदीनीशी लढविली होती. मात्र निकालात मतदारांनी भाजपाच्या लाटेतही वैभव हत्तुरे यांच्या विकासाला साथ दिल्याचे दिसून आले. त्यामुळे सोलापूर शहरात भाजपा ‘ब्रॅंड’ असला तरी प्रभाग २५ मध्ये हत्तुरे ‘ब्रॅंड’च चालतो, हे मतदारांनी पुन्हा एकदा सिध्द केला आहे.

Previous Post

या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला बसणार अँटी इन्कमबन्सीचा फटका

Next Post

शिक्षकांना करावी लागणार ‘पुन्हा टिईटी’ची वारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शिक्षकांना करावी लागणार ‘पुन्हा टिईटी’ची वारी

शिक्षकांना करावी लागणार 'पुन्हा टिईटी'ची वारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133831

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697