Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिक्षकांना करावी लागणार ‘पुन्हा टिईटी’ची वारी

टिईटीचा निकाल केवळ ३ टक्के

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 19, 2026
in सोलापूर
0
शिक्षकांना करावी लागणार ‘पुन्हा टिईटी’ची वारी
0
SHARES
397
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षकांच्या ‘टॅलेंट’विषयी शंका

सोलापूर..
सर्वोच्च न्यायालयाने
जिल्हा परिषद व माध्यमिक विभागात शिक्षक होण्यासाठी व नोकरी टिकवून ठेवण्यासाठी टिईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षकांसाठी टिईटी परीक्षा उत्तीर्ण सक्तीचे करण्यात आल्याने शिक्षकांमधून या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाले नाही. म्हणून तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या टिईटी परीक्षेचा निकाल लागला असून केवळ ‘ ३ ‘ टक्के शिक्षकच या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर परीणाम होणार आहे. सामाजिक शास्त्र १ व २ परीक्षेत ३ टक्के तर गणित व विज्ञान २ परीक्षेत २८ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे टिईटी परीक्षा शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सोलापूर जिल्ह्यातून जवळपास १२ हजार उमेदवारांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी १०,७८९ पेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली. एनआसीच्या पोर्टल वरील अंदाजीत माहिती प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील २३८ उमेदवार पास झाले आहेत. तर सेवेतील कर्मचारी उत्तीर्ण संख्या जवळपास ५८ पेक्षा जास्त आहे.
तीन महिन्यांपूर्वी राज्य परीक्षा परीषदेकडून टिईटी परीक्षा घेण्यात आली . सर्वोच्च न्यायालयाकडून सक्तीच्या करण्यात आलेल्या टिईटी परीक्षेसाठी राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आंदोलने केली . यावेळी शाळा बंद ठेवण्यात आले. पाच वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ ची मुदत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे. या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही, असा अभिप्राय विधि व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक शिक्षकांनी नोकरी टिकविण्यासाठी टिईटी परीक्षा दिली . मात्र या परीक्षेचा निकाल आश्चर्यकारक लागल्याने शिक्षकांना पुन्हा टिईटी परीक्षा वारी करावी लागणार आहे.
…
परीक्षा टिईटी
…..
इयत्ता १ ली ते ५ वी पाहिला पेपर
परीक्षेस बसले -१,५२६०५
उत्तीर्ण -४,७०९
टक्केवारी -३.०८%

इयत्ता ६ वी ते ८वी- दुसरा पेपर (- गणित विज्ञान)
परीक्षेला बसले- ७५,५९९
उत्तीर्ण झाले -२१,४१४
टक्केवारी- २८.३३%

इयत्ता ६ वी ते ८ वी (सामाजिकशास्त्र)
परीक्षेला बसले -१,२५,७४८
उत्तीर्ण -४,०४५
टक्केवारी – ३.२२%

एकूण -३,५३,९५२
पात्र _३०,१६८
टक्केवारी ९%
…
पेपर १ (इ. १ ली ते ५ वी) प्रविष्ट उमेदवार ..1,52,605 , उत्तीर्ण .. 4,709, निकाल 3.08% टक्के

पेपर २ -गणित/विज्ञान (इ. ६ वी ते ८ वी) प्रविष्ट उमेदवार ..
75,599 , उत्तीर्ण..21,414, निकाल.. 28.33% टक्के

पेपर २ -सामाजिकशास्त्र (इ. ६ वी ते ८ वी), प्रविष्ट उमेदवार..
1,25,748 उत्तीर्ण..4,045, निकाल.. 3.22% टक्के
……,
एकूण .. प्रविष्ट उमेदवार..
3,53,952 , उत्तीर्ण..30,168,
निकाल..,8.53% टक्के
…
थोडक्यात विश्लेषण..
…
सर्वाधिक निकाल पेपर २ (गणित विज्ञान) – 28.33 टक्के,

सर्वात कमी निकाल पेपर १ व पेपर २ (सामाजिकशास्त्र) – सुमारे 3 टक्के

एकत्रित निकाल (सर्व पेपर मिळून) – 8.53 टक्के

……

Previous Post

लाटेतही ‘हत्तुरें’चा ‘वैभव’ ठरला प्रभाग २५ चा ‘ब्रॅंड’

Next Post

दक्षिणमध्ये ‘ बापू ‘ समर्थकांची घालमेल

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणमध्ये ‘ बापू ‘ समर्थकांची घालमेल

दक्षिणमध्ये ' बापू ' समर्थकांची घालमेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133840

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697