Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणमध्ये ‘ बापू ‘ समर्थकांची घालमेल

उमेदवारीसाठी इच्छुक वेटींगवर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 19, 2026
in सोलापूर
0
दक्षिणमध्ये ‘ बापू ‘ समर्थकांची घालमेल
0
SHARES
385
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

 सोलापूर..
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दक्षिणमध्ये आमदार सुभाष देशमुख यांची एकहाती वर्चस्व होते. मात्र माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत उमेदवारीसाठी चुरस दिसून येत आहे. माजी आमदार माने हे निवडणूकीत कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे ताकद लावल्याचे सांगण्यात येत असल्याने आमदार देशमुख समर्थक इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे.
सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपाने ८७ जागा जिंकून सत्ता मिळविल्याने पालकमंत्र्यांसह तीनही आमदारांचा विश्वास दुणावला आहे. तसेच सोलापूर दक्षिण मतदारसंघातील जुळे सोलापूरातील राष्र्टवादी काॅंग्रेसचे वैभव हत्तुरे वगळता सर्व भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख व माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. दक्षिणमधील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ अक्कलकोट विधानसभा तर तीन मतदारसंघ दक्षिण विधानसभा क्षेत्रात आहे. त्यामुळे दक्षिणच्या तीन मतदारसंघापैकी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार दिलीप माने यांनी प्रत्येकी एक मतदारसंघावर दावा सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिणमधील हत्तूर, मंद्रूप व भंडारकवठे हे तीन जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. तीनही गट ताब्यात ठेवण्यासाठी आमदार देशमुख यांनी ताकद पणाला लावली असून पक्षाच्या वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नुकतेच भाजपात प्रवेश करून जुळे सोलापूरात चारपैकी तीन नगरसेवक निवडून आणणारे माजी आमदार माने यांनीही जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी तयारी सुरू ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे माने समर्थकांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आमदार कल्याणशेट्टी यांनी त्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला असून कार्यकर्तेही तयारीला लागली आहेत. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार ? हे सांगणे कठीण आहे. मात्र प्रत्येक जण आपल्या समर्थकांसाठी सर्व शक्ती खर्च करीत आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत अन्य पक्षातील इच्छुकांना ऐनवेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येनकेन प्रकारे दक्षिण पंचायत समितीवर भाजपाची सत्ता आणण्याचा व जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे सर्वांच्या सहमतीने उमेदवारी देणार कि महानगर पालिकेसारखे ऐनवेळी एबी फाॅर्म देणार ? हे बुधवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
….
उमेदवारी देण्यात पालकमंत्री व दादांचे वर्चस्व
…
दक्षिणमधील निवडणूकीसाठी उमेदवारी देण्याचा अधिकार पालकमंत्र्यांकडे असल्याने व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने उमेदवारी देण्यात झुकता माप असणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी समर्थकांसाठी उमेदवारीची शिफारस केला असला तरी त्यांच्या नावांना संमती मिळणे मुश्कील असल्याचे सांगण्यात येत आहे.
….
भाजपाकडून उमेदवारी जाहीर नाही
..,
सोलापूर महानगर पालिकेत अनेक इच्छुकांना ऐनवेळी संधी दिल्याने ते निवडून आले. त्यामुळे उमेदवारी जाहीर करून इच्छुकांमध्ये नाराजी वाढू नये यासाठी उमेदवारी जाहीर करण्यापेक्षा अर्ज भरताना एबी फाॅर्म देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपाकडून इच्छुक पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र उमेदवारी ‘ फिक्स’ करून इच्छुकांना वेटींगवर ठेवली आहेत.
…..

Previous Post

शिक्षकांना करावी लागणार ‘पुन्हा टिईटी’ची वारी

Next Post

इच्छुकांना उमेदवारीची नाही शाश्वती

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
इच्छुकांना उमेदवारीची नाही शाश्वती

इच्छुकांना उमेदवारीची नाही शाश्वती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133865

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697