Tuesday, June 30, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

इच्छुकांना उमेदवारीची नाही शाश्वती

दक्षिणमध्ये इच्छुकांमध्ये अर्ज भरण्यासाठी नाराजी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 19, 2026
in सोलापूर
0
इच्छुकांना उमेदवारीची नाही शाश्वती
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘दक्षिण’मध्ये ४६८ अर्जांची विक्री

भाजपाचे ५, शिवसेना १ तर काॅंग्रेसकडून १ उमेदवारी दाखल

 सोलापूर …
इच्छुकांकडून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेसाठी ३ तर पंचायत समितीसाठी ४ जणांनी उमेदवारी दाखल केला आहे.
यामध्ये बोरामणी गटासाठी धनेश अचलारे, शिवसेना, हत्तूर गटासाठी उज्ज्वला अनिल हवीनाळे , भाजपा, भंडारकवठे गटासाठी रुपादेवी अमसिद्ध कमळे, कॉंग्रेस यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर बोरामणी गणासाठी सारिका पाटील, भाजपा,
कुंभारी गणासाठी अशोक करजोळे , भाजपा, औराद गणासाठी संदीप टेळे , भाजपा, निंबर्गी गणासाठी सुषमा दुपारगुड़े , भाजपा यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी सांगितले. पक्षाकडून अद्याप उमेदवारीची शाश्वती नसल्याने उमेदवारी दाखल करणार्‍यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
१६ जानेवारीपासून दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. दक्षिणमध्ये ४६८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेला आहे. तर सोमवारी भाजपा ५, शिवसेना शिंदे गट १ तर काॅंग्रेसकडून १ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बुधवारी २१ जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून त्यावेळी इच्छुकांची गर्दी दिसून येणार आहे.
नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका होत असल्याने प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी टाळण्यासाठी अद्याप कोणत्याच पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही. मात्र इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज घेणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून चार दिवसात ४६८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.
शुक्रवार १६ जानेवारी रोजी १९५, शनिवार १७ जानेवारी रोजी ११० तर सोमवार १९ रोजी १६३ अर्जांची विक्री झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
….
भाजपाकडून एबी फाॅर्म नाही
….
भाजपाकडून उमेदवारी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आली आहे. मात्र जागा वाटप न झाल्याने इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून एबी फाॅर्म देण्यात आले नाही. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयात एबी फाॅर्म देण्यात येणार असल्याचे एका इच्छुकांनी सांगितले. त्यामुळे इच्छुकांमध्ये कोणाची लाॅटरी लागणार? याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

दक्षिणमध्ये ‘ बापू ‘ समर्थकांची घालमेल

Next Post

दोन ग्रामसेवक ठरले आदर्श

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दोन ग्रामसेवक ठरले आदर्श

दोन ग्रामसेवक ठरले आदर्श

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक