Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दोन ग्रामसेवक ठरले आदर्श

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 19, 2026
in सोलापूर
0
दोन ग्रामसेवक ठरले आदर्श
0
SHARES
610
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आदर्श ग्रामसेवकांचा शासनाकडून होणार सन्मान 

सोलापूर …
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक म्हणून सन्मानित करण्याची शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवक यांना शासन स्तरावरुन यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार देण्यात येतात. सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या कालावधीत कोविड-१९ च्या प्रादुभावामुळे पुरस्कार जाहिर केले नाही. त्यामुळे राज्य शासनाने आता या दोन्ही वर्षाकरीताचे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची यादी जाहीर केली असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामसेवकांचा समावेश आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील यावलीचे ग्रामसेवक किरण वाघमारे व मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरीचे ग्रामसेवक संजय शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रत्येक जिल्ह्यातुन एक या प्रमाणे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ग्रामविकासमंत्री यांच्या हस्ते यशवंत पंचायत अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी वितरीत करण्यात येतो. सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्या ग्रामसेवकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येते. त्यानुसार राज्यातील आठ विभागातून ३० ग्रामसेवकांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळालेल्या ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन विभाग स्मिता पाटील व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी अभिनंदन केला आहे.

Previous Post

इच्छुकांना उमेदवारीची नाही शाश्वती

Next Post

निवडणूका नको रे बाबा !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
निवडणूका नको रे बाबा !

निवडणूका नको रे बाबा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697