Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिवसेना जिल्हाप्रमुखांची ‘होमपीच’वर कसोटी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 23, 2026
in सोलापूर
0
शिवसेना जिल्हाप्रमुखांची ‘होमपीच’वर कसोटी
0
SHARES
307
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हत्तूर जिल्हा परिषद गटात धनुष्यबाण चालणार?

सोलापूर…

हत्तूर जिल्हा परीषद गटातून शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मातोश्री लक्ष्मीताई पाटील निवडणूक लढवित आहेत. हत्तूर जिल्हा परीषद गट हा अमर पाटील यांचा होमपीच आहे. हा होमपीच काबीज करण्यासाठी पाटील यांची कसोटी पणाला लागली आहे. त्यामुळे पाटील व हविनाळे या युध्दात पाटील विजयी होणार का ? हे पाहावे लागेल.

२०१७ मध्ये हत्तूर जिल्हा परीषद गटासाठी अमर पाटील, अप्पासाहेब पाटील व डाॅ. चनगोंडा हविनाळे यांच्यात सामना रंगला होता. यामध्ये अमर पाटील विजयी झाले. त्यामुळे पाटील व हविनाळे यांची राजकीय सामना पुन्हा एखदा अनुभवास येणार आहे. मात्र यावेळी दुरंगी लढत होत असून सत्ताधारी भाजपकडून उज्वला हविनाळे या खिंड लढवित असल्यामुळे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. मागील निवडणूकीतील अनेक सहकारी व कार्यकर्ते पाटील यांना सोडून भाजपमध्ये गेल्यामुळे पाटील यांना मतदारसंघ पिंजून काढून नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करावी लागणार आहे. डाॅ. हविनाळे यांचा जनसंपर्क व कार्यकर्त्यांची फळी यामुळे ते प्रचारात आघाडीवर दिसून येत आहेत.

अमर पाटील या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख झाल्यापासून दक्षिणमध्ये पक्षविस्तार न झाल्याने उमेदवारी मिळविताना अडचणी निर्माण झाले. शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवित असल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची दमछाक होणार आहे. पाटील यांनी जुने सवंगडीच घेऊन रणांगण गाजवित असल्यामुळे निवडणूकीतील रणनीतीविषयी चर्चा सुरू आहे. माजी आमदार रतिकांत पाटील यांना मानणारा वर्ग असला तरी आमदार सुभाष देशमुख हत्तूर गटावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याने पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची कसोटी पणाला लागली आहे.

Previous Post

आधी दोस्ती , मग कुस्ती

Next Post

अकोलेच्या ‘अण्णां’ची वाढतेय क्रेझ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अकोलेच्या ‘अण्णां’ची वाढतेय क्रेझ

अकोलेच्या 'अण्णां'ची वाढतेय क्रेझ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133870

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697