Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आधी दोस्ती , मग कुस्ती

मंद्रूपमध्ये निवडणूका होणार खेळीमेळीत

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 23, 2026
in सोलापूर
0
आधी दोस्ती , मग कुस्ती

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 31;

0
SHARES
745
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूपचे उमेदवार रंगले गप्पांमध्ये

उमेदवार रस्सीखेच संपला, प्रचार सुरू

सोलापूर…
निवडणूक म्हटले की चार दिवसाचा खेळ. त्यामुळे यासाठी मैत्री, नाते व ऋणानुबंध जोपासण्याची गरज आहे. त्यामुळेच मंद्रूपचे भाजपा, काॅंग्रेस व शिवसेना या पक्षांचे उमेदवार योगायोगाने मोतीलाल राठोड यांना भेटण्यासाठी आल्यानंतर आधी दोस्ती, निवडणूकीच्या मग कुस्तीला महत्व दिल्याने निवडणूका खेळीमेळीत होणार असल्याची प्रचिती दिली.
मंद्रूप हे सर्वधर्मसमभाव मानणारा व सर्वसमावेशक गाव असल्याने प्रत्येकजण मैत्री व दोस्तीला महत्व देतो. मग तो कोणत्याही समाजाचा व पक्षाचा असला तरी मैत्रीमध्ये खंड पडत नाही. याची प्रचिती जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणूक सुरू झाल्यापासून दिसून येत आहे. शुक्रवारपासून प्रचार सुरू झाला असून उमेदवारांकडून गाठीभेठी व जनसंपर्क सुरू करण्यात आला आहे. मंद्रूपमध्ये आॅल इंडीया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल राठोड हे सर्वसमावेशक व मितभाषी व्यक्तीमत्व असल्याने त्यांना भेटण्यासाठी उमेदवारांची रेलचेल सुरू झाली आहे. भाजपाचे प्रशांत कडते, काॅंग्रेसचे महमद शेख व शिवसेनेचे संतोष बरूरे यांच्यासह पंचायत समितीचे भाजपा उमेदवार मळसिध्द मुगळे यांनीही राठोड यांची भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, शिवाजी चव्हाण , सिध्दू सिंदखेडे व श्रीमंत पवार उपस्थित होते.
दक्षिण मधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाली आहेत. गुरूवार २२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यामुळे कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार ? ठरला आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांकडून शुक्रवार २३ जानेवारीपासून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे .
यावेळी पक्षाकडून इच्छुक असताना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या नाराज उमेदवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणे व चाय पे चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी धडपड करीत आहे. दक्षिण मधील भाजपाकडील उमेदवारासाठी इच्छुकांची मोठी गर्दी असल्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार ? याकडे लक्ष लागले होते . मात्र या उमेदवारी निवडीत पक्षाकडून मोठ्या गावातील मतदारांकडे दुर्लक्ष करून उमेदवारी देण्यात आल्यामुळे उमेदवारांची प्रचारामध्ये दमछाक होताना दिसून येत आहे. त्यामुळे २७ जानेवारीला निवडणुकीचा अंतिम चित्र स्पष्ट होणार असला तरी २३ जानेवारीपासूनच उमेदवार चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. गर्दी असेल तिथे थांबणे, चौका चौकात गप्पा मारणे तसेच अक्का ,मामा, ताई, दादा म्हणत प्रत्येकाला आपल्यालाच मतदान करण्यासाठी विनंती करणे अशा गोष्टी सध्या दिसून येत आहेत.

Previous Post

सामाजिक कार्यामुळे श्रुती भोरगुंडे उमेदवारी मिळविण्यात ठरल्या सरस

Next Post

शिवसेना जिल्हाप्रमुखांची ‘होमपीच’वर कसोटी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शिवसेना जिल्हाप्रमुखांची ‘होमपीच’वर कसोटी

शिवसेना जिल्हाप्रमुखांची 'होमपीच'वर कसोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133870

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697