Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘भाईं’चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 25, 2026
in सोलापूर
0
‘भाईं’चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान
0
SHARES
645
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘भाईं’ची मंद्रूपमधील प्रस्थांपितांना आव्हान

काॅंग्रेसने निष्ठावानाला दिली संधी

मंद्रूप जिल्हा परीषदेसाठी सनाकौसर ठरल्या ‘लकी’

मंद्रुप… काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख यांनी काॅंग्रेसचे निष्ठावान म्हणून मंद्रूप जिल्हा परिषद गटासाठी पत्नी सनाकौसर शेख यांना उमेदवारी मिळवून दिली आहे . त्यामुळे मंद्रूपमध्ये प्रस्थापितां विरोधात सामान्य कार्यकर्ता अशी लढत होत आहे. काॅंग्रेसने आघाडी न करता काँग्रेसने ‘लढवय्या’ निष्ठावनाला संधी दिल्यामुळे महमद ‘भाईं’ची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेक दिग्गज इच्छुक असताना उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र पती महमद यांच्या प्रयत्नामुळे सनाकौसर शेख यांना उमेदवारी मिळाल्याने त्या ‘लकी’ ठरल्या आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप जिल्हा परिषद गट चर्चेचा विषय ठरत आहे . या ठिकाणी भाजपचे माजी सभापती सोनाली कडते, माजी सभापती स्व. गोपाळराव कोरे यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या विरोधात महमद शेख यांनी दंड थोपटला असून निवडणूकीत रंगत आणली आहे.  शेख यांनी निवडणूकीत उडी घेवून प्रस्थापितांना आव्हान दिली आहे. शेख यांनी जिल्हा काँग्रेसचे सचिव झाल्यापासून काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला. काँग्रेसचे विचार मतदारांच्या व सर्वसामान्यां पर्यंत पोहोचविला. त्यामुळे मंद्रूप परिसरात काँग्रेस जिवंत राहण्यास मदत झाली आहे . मंद्रूप जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्यामुळे या ठिकाणी महमद शेख पत्नी सनाकौसर यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. उमेदवारी मिळविण्यासाठी ते दररोज काॅंग्रेस भवनला चकरा मारत होते. त्यांच्या उमेदवारी मागणीला चेष्ट्याचा विषय समजण्यात आला. मात्र शेख यांनी काॅंग्रेसचे विचार जिवंत ठेवण्यासाठी पक्षातील सर्व विरोधकांवर मात करीत व एकाकी झुंज देत जिल्हा परिषद उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे ते सध्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवून पत्नी सनाकौसर यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे .
मंद्रूप मध्ये अनेक वर्षांपासून सत्ताधारी असणाऱ्या व यापूर्वी पंचायत समिती सभापती असणाऱ्या यांच्या विरोधात विचारांची लढाई असल्याचे सांगताना काॅंग्रेसच्या उमेदवार सनाकौसर शेख या ‘हाताच्या पंजाला’ मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. महमद शेख हे पत्नी सनाकौसर यांना घेऊन कुटुंबाच्या सदस्यांच्या मदतीने प्रचार करीत आहेत. त्यांच्या प्रचाराची चर्चा मंद्रूप परिसरात होताना दिसून येत आहे . मंद्रूपच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन शेख करीत आहेत.

Previous Post

उमेदवारांनो, दोन दिवस माघार नाही

Next Post

हत्तूरच्या विकासासाठी “डिपीडीसी” निधी भरभरून दिला

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
हत्तूरच्या विकासासाठी “डिपीडीसी” निधी भरभरून दिला

हत्तूरच्या विकासासाठी "डिपीडीसी" निधी भरभरून दिला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134225

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697