Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

साहेब, तुमच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 27, 2026
in सोलापूर
0
साहेब, तुमच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार !
0
SHARES
550
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वांगी ग्रामस्थांचा भाजपाचे उमेदवार मळसिध्द मुगळे यांना ग्वाही

मंद्रूप…
सप्टेंबर महिन्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील लोकांना आठ दिवस घर व शेती सोडून स्थलांतर व्हावे लागले.त्यामुळे त्यांच्या भोजन व निवासाची समस्या असताना मंद्रूपमधील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मळसिध्द मुगळे यांनी महापुर आल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून पूरग्रस्तांसाठी भोजन व निवासाची सोय केली. शेतात वस्तीवर राहून अनेक शेतकरी भोजनाच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्यापर्यंत भोजन पोहोच केला. संकटकाळात नातेवाईकांकडून विचारणा होण्यापूर्वी मुगळे यांचे कार्यकर्ते भोजन घेऊन हजर झाले होते. त्यामुळे पूरग्रस्तांना  त्याची जाणिव आहे.  चार महिन्यानंतर मुगळे मंद्रूप पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार म्हणून मतदारांशी संवाद साधण्यासाठी गेल्यानंतर वांगी व वडकबाळच्या मतदारांमधून ऋण व्यक्त करून त्यांच्या विजयाची खात्री देत आहेत. साहेब, तुमच्या विजयात आमच्या गावाचा सिंहाचा वाटा असेल, अशी ग्वाही देत आहेत.

  वांगी ग्रामस्थांनी मुगळे यांच्या सामाजिक कार्याला बळ मिळावे, म्हणून आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे मुगळे यांना मंद्रूप पंचायत समितीची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. भाजपाकडून उमेदवारी दिल्यास संपूर्ण वांगी गावातून त्यांना मताधिक्य देणार असल्याचे सांगितले होते.
मळसिध्द मुगळे यांनी ज्ञानयोगी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने दररोज सीना नदीकाठावरील आठ ते दहा गावातील हजार ते दीड हजार पूरग्रस्तांसाठी भोजन बनवून प्रत्येक स्थलांतरीतापर्यंत भोजन स्वताच्या वाहनाने पोहोच करायचे. शिवाय मंद्रूपमध्ये आठ दिवस वैद्यकीय उपचारासह निवासाची उत्तम सोय केली. त्यामुळे आठ दिवस पूरग्रस्तांना भोजन व निवासाची कोणतीही अडचण आली नाही.
मळसिध्द मुगळे मंद्रूप पंचायत समिती गणातून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. उमेदवारी दाखल केल्यानंतर मुगळे वांगी व वडकबाळच्या मतदारांना मतदान करण्याची विनंती केल्यानंतर मतदारांमधून कृतज्ञता व्यक्त करीत सर्व परीने मदत करण्याची ग्वाही मिळत आहे. तसेच यावेळी अनेक ज्येष्ठ मतदारांनी विजयाचे आशीर्वादही दिला .

Previous Post

भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडवा

Next Post

राष्र्टभक्तीसाठी पाच हजार विद्यार्थांचे शिस्तबध्द कवायत

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
राष्र्टभक्तीसाठी पाच हजार विद्यार्थांचे शिस्तबध्द कवायत

राष्र्टभक्तीसाठी पाच हजार विद्यार्थांचे शिस्तबध्द कवायत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133921

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697