Saturday, June 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“अनंत”ला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही

मंद्रूपच्या आखाड्यात ढाण्या वाघाची 'एंट्री'

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 31, 2026
in सोलापूर
0
“अनंत”ला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही
0
SHARES
638
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे काॅंग्रेसच्या प्रचारात सक्रीय

मंद्रूप…
मंद्रूपचा आखाडा म्हणल कि माजी सभापती गुरूनाथ म्हेत्रे यांचे नाव आल्याशिवाय राहत नाही. मग ते कुस्तीचे असो अथवा राजकीय आखाडा. आता याच राजकीय आखाड्यात माजी सभापती गुरूनाथ म्हेत्रे यांची एंट्री झाल्याने विरोधकांची खैर नाही. मंद्रूपचे मुलुख मैदान तोफ म्हणून त्यांची ओळख असून गुरू मामा आता पुतण्या व काॅंग्रेसचे उमेदवार अनंत म्हेत्रे यांच्या प्रचारासाठी पंचायत समिती निवडणूकीत उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणातून विरोधकांवर विकासात्मक टिका होणार असल्याने मतदारांमध्ये त्यांच्या भाषणाची प्रतीक्षा आहे. मामा कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन मतदारांना अनंत हेत्रे यांना निवडून देण्याची विनंती करीत आहेत.
पुतण्या अनंत म्हेत्रे याला निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा ‘पण’ करून गुरू मामा निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ‘मामां’ना खासदार ‘ताई’ यांची खंबीर साथ असल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवाराविरूध्द त्यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे उमेदवार अनंत म्हेत्रे यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.

मंद्रूपचं राजकारण म्हणले कि मामांच्या भाषणाची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. अपवाद वगळता मामा नेहमी काॅंग्रेसच्या सोबत राहून विजयात सिंहाचा वाटेकरी ठरले आहेत. त्यामुळे मंद्रूपच्या विकासात भरीव योगदान म्हणून मामांची चर्चा होते. आता गुरूमामांनी काॅंग्रेसचे उमेदवार व पुतण्या अनंत म्हेत्रे यांच्या विजयासाठी शक्ती लावली असून अनंत निवडून आल्याशिवाय राहणार नाही, मग विरोधी उमेदवार कुणीही अशी , गर्जना करताना दिसून येत आहेत. प्रचार शुभारंभप्रसंगी मामानी अर्जूनराव टेळे, मोतीराम चव्हाण, सुरेश पाटील, चंद्रकांत ख्याडे, जगनाथ म्हेत्रे, प्रदीप ख्याडे, पंडीत हिरेमठ, पिरप्प्पा म्हेत्रे, महमद शेख यांना सोबत घेऊन निवडणूकीचे रणनिती आखत आहेत.त्यामुळे गुरूमामा यांना काका म्हणून राजकारणात एंट्री केलेल्या अनंत म्हेत्रे यांची विजयाकडे घोडदौड सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

सत्ताधार्‍यांना फुटबाॅलचा किक बसणार

Next Post

निवडून दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
निवडून दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करणार

निवडून दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

June 26, 2026
निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक