Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विकासामुळे भाजपाचा विजय निश्चित

आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 31, 2026
in सोलापूर
0
विकासामुळे भाजपाचा विजय निश्चित
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कंदलगावात आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ

कंदलगाव …
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने विविध योजनांमधून कोट्यावधी रूपयांच्या निधीमधून विकासकामे केली आहेत. दक्षिणमधील मतदारांचा सेवक म्हणून विकासाची गंगा आणली असून यापुढेही मतदारांच्या सेवेसाठी भाजपाचे उमेदवार सदैव तत्पर असणार आहेत. त्यामुळे भाजपाने केलेल्या विकासकामांमुळे कंदलगाव जिल्हा परिषद गटातून सोनाली कडते व पंचायत समिती गणातून प्रियांका आसबे यांचे विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
कंदलगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कंदलगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोनाली कडते व पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रियांका आसबे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते ग्रामदैवताच्या चरणी नारळ वाढवून करण्यात आला.
कंदलगाव येथील श्री केदारेश्वर, बिरलिंगेश्वर व महालिंगेश्वर मंदिरात विधीवत पूजन करून प्रचारास सुरुवात करण्यात आली. आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचार दौर्‍यामुळे कंदलगाव परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
या प्रसंगी कंदलगावच्या सरपंच शारदाताई कडते, उद्योजक रमेश आसबे, प्रशांत कडते,भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, मनगोळीच्या सरपंच तेजश्री गायकवाड, उपसरपंच अमित नरुटे, माजी सरपंच शरीफ शेख, विंचूरचे सरपंच बाळासाहेब पाटील यांच्यासह भाजपचे नेते यतीन शहा, हणमंत कुलकर्णी, विजय कुलकर्णी, तुळशीराम पवार, चंद्रकांत निंगफोडे, सुभाष कडते, आनंदराव कोले तसेच माजी सरपंच बाबासाहेब पाटील, समाधान घंटे, शिवानंद होनराव, गजीनाथ शेजाळ, प्रकाश कोरे, परमेश्वर सुरवसे, नितीन रणखांबे, संजय गायकवाड, ब्रम्हदेव सलगरे, सुखदेव गावडे आदी उपस्थित होते.

Previous Post

निवडून दिल्यास मतदारसंघाचा कायापालट करणार

Next Post

श्रृती गायगवळी यांची निंबर्गी गणात प्रचाराचा झंझावात

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
श्रृती गायगवळी यांची निंबर्गी गणात प्रचाराचा झंझावात

श्रृती गायगवळी यांची निंबर्गी गणात प्रचाराचा झंझावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133946

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697