मंद्रूप जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेशोत्सव आनंदात
मंद्रूप … शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्याचा शासनाचा आदेश असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेने मुलांची उंटावरून मिरवणूक काढून प्रवेशोत्सव साजरा केला. उंटावरून मिरवणूक काढल्यामुळे पहिलीची मुले भारावून गेली. त्यामुळे त्यांच्यामध्ये शाळेची गोडी निर्माण होण्यास मदत झाली. उंटासह जिल्हा परिषद शाळेकडून पहिली वर्गाच्या मुलांना मोटार कार, ट्रॅक्टर, बैलगाडी व रिक्षा यांच्यामध्ये बसवून मिरवणूक काढण्यात आली . सर्वात प्रथम देशभक्तीपर गीत लावून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.

त्यानंतर मंद्रूप जिल्हा परिषद शाळेत आल्यानंतर लोकप्रतिनिधी व पालकांच्या उपस्थितीत पहिलीच्या मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी पहिलीसह इतर वर्गातील मुलांना गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले .

यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, सरपंच अनिता कोरे , उपसरपंच भगवान व्हनमाने, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेंडगुदले यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष व्हनमाने, अंकिता रावत , बबलू शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी व सर्व शाळेचे मुख्याद्यापक प्रकाश कुंभार, मुख्याद्यापिका सुहासिनी शेंडे , जहाॅंआरा तांबोळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राजमाने यांनी केला. मुख्याद्यापक प्रकाश कुंभार यांनी आभार मानले.
…
चौकट
….
विद्यार्थ्यांना माणुसकीचे धडे द्या
….
आजच्या शिक्षण पध्दतीत गुणाला महत्व प्राप्त झाल्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. मुले समाजामध्ये रममाण न होता मोबाईलमध्ये बिजी असल्यामुळे त्यांना पराभव सहन होत नाही. त्यामुळे आत्महत्या प्रमाण वाढत आहेत. म्हणून शिक्षकांनी मुलांना माणुसकीची धडे देण्याची गरज आहे . विद्यार्थ्याला समाजामध्ये माणूस म्हणून जगण्यास पात्र केल्यास शिक्षणाचे सार्थक होते. असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य मळसिध्द मुगळे यांनी केले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









