हत्तूर येथील ट्राय पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
हत्तूर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्तूर येथील ट्राय पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्प, शुभेच्छा आणि आनंददायी उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत भरले यांच्यासह पालक उपस्थित होते.

यावेळी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. त्यांनी शाळेतील स्वागत उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, शिस्त आणि संस्कार यांना प्राधान्य देत सर्वांगीण प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेच्या व्यवस्थापनाने व शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांना आनंदी आणि सकारात्मक वातावरणात शिक्षणाची सुरुवात करून देण्यासाठी विशेष नियोजन केले होते. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते. प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांच्या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









