Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जात वैद्यता प्रमाणपत्रासाठी कोळी महासंघाकडून आंंदोलन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 16, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोळी महासंघातर्फे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 

सोलापूर, : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर कोळी घ्या समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याकरिता तसेच रक्त नात्यातील नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरिता कोळी महासंंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्र्टाचे तात्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीला अनेक मंत्री खासदार,आमदार व वरिष्ठ  अधिकारी व आदिवासी कोळी समाजाचे शिष्टमंडळ/ प्रतिनिधी यांचा उपस्थित होते.

यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तसेच विविध जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या अन्नत्या उपोषणामध्ये, आंदोलनमध्ये होत असलेल्या जातीच्या दाखल्याची व जात प्रमाणपत्राची प्रामुख्याने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

मात्र दोन वर्षाचा कालावधी उलटले तरी अंमलबजावणी करण्यास सरकारकडून दिरंगाई होत असल्याने आदिवासी कोळी समाजामध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयाच्या सातत्याने पाठपुरवठा करण्यात येत असून 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या निर्णयाची/इतिवृत्ताची तात्काळ अंमलबजावणी व्हावी व शासनाने आवश्यक ते परिपत्रक काढावे याकरिता महाराष्ट्र राज्यात एकाच वेळीस सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व निवेदन देण्याकरता कोळी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


पावसाळी अधिवेशनामध्ये आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न मार्गी न लावल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर माजी आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघ  तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.चेतन पाटील यांनी दिली त्यांच्यासोबत कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, ऋषी लोणारी, कार्याध्यक्ष शंभू माने, शहरअधक्ष अप्पासाहेब हिप्परगे, अजय माने, नरसप्पा केचकर, काशीनाथ शिरसीकर, नितीन वालीकर , कपील कोळी, चंद्रकांत टक्के, .नागेश कोळी , आनंद बिराजदार, रोहित हुमनाबादकर,  सिद्धार्थ कोळी सोनेगाव, ओंकार हुमनाबादकर, नागेश कोळी वकील, नितीन होनकूबडे, सतीश घंटे, नरेश मायनाळ, राजकुमार बिराजदार कोळी, सुरेश जमादार, सातलीग कोळी ,चंद्रकांत कोळी , चंद्रकांत. नायकोडी, रवी कोळी यांच्यासह कोळी  बांधव उपस्थित होते.

Previous Post

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

Next Post

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा 'तोडगा' की नव्या 'संकटा'ची भर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135096

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697