Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 28, 2026
in सोलापूर
0
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

सोलापूर.. रक्षाबंधनाचा पवित्र सण म्हणजे केवळ मनगटावर बांधला जाणारा राखीचा धागा नव्हे, तर भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या अतूट नात्याची जपणूक करणारा दिवस. याच भावनेतून शिवसेनेच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी रक्षाबंधनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याला भावनिक उजाळा दिला शिवसेनेत प्रवेश केल्यापासून दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी डॉ. वाघमारे या एकनाथ शिंदे यांना राखी बांधतात.

यावेळी त्यांनी अत्यंत आपुलकीने राखी बांधत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिंदे साहेबांनी मला सख्ख्या बहिणीप्रमाणे प्रेम आणि मान दिला. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संसदेत काम करण्याची संधी दिली राज्यसभेची खासदार झाल्याचा आनंद मोठा होता मात्र शिंदे साहेबांना राखी बांधताना मिळणारा आनंद त्याहूनही मोठा आहे, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण, ‘लेक लाडकी’ योजना, सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्य करण्याचा निर्णय तसेच एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांच्या आत्मविश्वासाला बळ मिळाल्याचे सांगितले.                 महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एकनाथ शिंदे हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर त्यांचे लाडके भाऊ आहेत महिलांच्या आयुष्यात सन्मान, आधार आणि स्वावलंबन निर्माण करणाऱ्या या लाडक्या भावाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची खरी ओवाळणी ठरेल, असा विश्वास डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पत्रकार गोंजारींवरील गुन्ह्याविरोधात पत्रकार संघटना आक्रमक

Next Post

दक्षिण बीडीओंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला पोलीस अधीक्षकांचे बळ !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिण बीडीओंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला पोलीस अधीक्षकांचे बळ !

दक्षिण बीडीओंच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला पोलीस अधीक्षकांचे बळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133030

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697