Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिण बीडीओंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला पोलीस अधीक्षकांचे बळ !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 29, 2026
in सोलापूर
0
दक्षिण बीडीओंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला पोलीस अधीक्षकांचे बळ !
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

”धोत्रीच्या जिल्हा परिषद शाळेला पोलिसांकडून 6 लाखांची भेट”

दक्षिण सोलापूर, : दक्षिण सोलापूरचे बीडीओ मनोज राऊत यांनी ग्रामीण भागातील मुलांनी इंग्रजीत ‘फाडफाड’ बोलावे, यासाठी सुरू केलेल्या ‘स्पोकन इंग्लिश’ या ड्रीम प्रोजेक्टला आता पोलीस प्रशासनाने हातभार लावला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांनी या उपक्रमाचे कौतुक करून तो संपूर्ण जिल्ह्यात राबवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि वळसंगचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी मोठी मदत केली आहे.

पोलीस प्रशासनाकडून दक्षिण तालुक्यातील धोत्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेला 2 लाखांचा इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आणि 4 लाखांची हायड्रोजन गॅस प्रणाली* अशा एकूण 6 लाख रुपयांच्या शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली आहे.

बीडीओ मनोज राऊत यांनी दक्षिणमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. मुलांनी पहिलीपासूनच इंग्रजीत बोलावे, वाचावे, फलकलेखन आणि परिपाठ इंग्रजीत करावा यासाठी त्यांनी शिक्षकांच्या बैठका घेऊन नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. बोलीभाषेचे थेट इंग्रजीत भाषांतर करून ते मुलांमध्ये आवड निर्माण करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेक शाळांमधील मुले आता आत्मविश्वासाने इंग्रजीत बोलू लागली आहेत. शाळांना ‘फाईव्ह स्टार’ दर्जा देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या या तळमळीची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी ही मदत केली असून, यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

   

  शैक्षणिक  विकासाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा

‘ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी मिळालेली ही भेट अत्यंत प्रेरणादायी आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक आनंददायी आणि कृतीशील होईल. शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.”

मनोज राऊत, बीडीओ , पंचायत समिती , दक्षिण सोलापूर

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधली राखी

Next Post

दानम्मादेवी पालखी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न.

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दानम्मादेवी पालखी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न.

दानम्मादेवी पालखी यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133029

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697