श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त व अमोघसिद्ध मंदिर कळसारोहण दिनाचे औचित्य
दक्षिण सोलापूर –
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त व अमोघसिद्ध मंदिर कळसारोहण वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दि. २९ ऑगस्ट ते ०५ सप्टेंबर या कालावधीत होणार असून व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. अभिमान महाराज घंटे व ह.भ.प. विजय साळुंके महाराज हे काम पाहत आहेत.
सप्ताहात पहाटे ४.३० वाजता काकडा आरती, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ९ ते १२ वा. गाथा भजन, सायं. ५ वा. हरिपाठ, सायं. ६.३० वा. प्रवचन, रात्री ८ ते १० हरिकीर्तन व रात्री १० ते ३ हरिजागर असे नित्य कार्यक्रम होणार आहेत. दिनांक २९ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर दरम्यान नंदूरचे ह.भ.प. नवनाथ महाराज पाटील, अकोलेचे ह.भ.प. जय भगरे महाराज व ह.भ.प. गोटू पाटील महाराज, गावडेवाडीचे ह.भ.प. नागनाथ महाराज कोळेकर, गुंजेगावचे ह.भ.प. विजय साळुंके महाराज, तेलगाव (सीना)चे बाबुराव दादा माने, वटवटेचे ह.भ.प. कामण्णा पाटील महाराज यांची प्रवचन सेवा होणार आहे.
तसेच पंढरपूर खेड भाळवणीचे ह.भ.प. माऊली महाराज पवार, मनगोळीचे ह.भ.प. अभिमान घंटे महाराज, पंढरपूरचे ह.भ.प. मच्छिंद्र काकडे महाराज, गावडी दारफळचे अच्युत पुरी महाराज, राळेरासचे ह.भ.प. समाधान निंचळ महाराज, लातूरचे ह.भ.प. नितीन जगताप महाराज व अंकोलीचे बाल कीर्तनकार ह.भ.प. प्रज्ञा पुजारी महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे.
शनिवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ वा. ह.भ.प. माऊली महाराज बचुटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या सोहळ्यास मनगोळी, नंदूर, गावडेवाडी, कवठे, सादेपुर, तोगराळी, आचेगाव, भाटेवाडी, पाथरी, तेलगाव सीना, एसआरपी कॅम्प सोलापूर, अकोले मंद्रूप, गुंजेगाव, कंदलगाव, विंचूर, हराळवाडी व भारूडकार ह.भ.प. महांतेश महाराज घंटे यांच्या भजनी मंडळासह श्री हरी भजनी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













