Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर (रंगभवन) – मंद्रूप नवीन एसटी बस सेवा सुरू, नियंत्रकांची प्रतीक्षा !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 1, 2026
in सोलापूर
0
सोलापूर (रंगभवन) – मंद्रूप नवीन एसटी बस सेवा सुरू, नियंत्रकांची प्रतीक्षा !
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते नवीन एसटीचे पूजन

बापू,  एसटी आल्या, आता नियंत्रकांना आणा ! प्रवाशांची मागणी
—
दक्षिण सोलापूर :
मंद्रूप व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सोलापूर (रंगभवन) ते मंद्रूप नवीन एसटी बस सेवा १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरू झाली असून, दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष देशमुख आणि माजी ग्रामपंचायत सदस्य तमण्णा पुजारी यांच्या हस्ते नवीन बसचे पूजन करण्यात आले. यावेळी सोलापूर आगाराचे सहव्यवस्थापक मल्लिकार्जुन अंजुटगी, उपसरपंच भगवान व्हनमाने, भाजपा सरचिटणीस गौरीशंकर मेंडगुदले, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ , शिवानंद लाभे, दयानंद ख्याडे, मळसिद्ध पुजारी, सिद्धलिंग म्हेत्रे, प्रसाद साठे, चित्रसेन कोळी, खाजाभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार देशमुख यांनी सीना भीमा खोर्‍यातील प्रवाशांची नवीन एसटी सुरू करून व फेर्‍या वाढवून गैरसोय दूर केली आहे. त्यामुळे एसटी आल्या, आता मंद्रूप बसस्थानकावर एसटीव नियंत्रण ठेवण्यासाठी व प्रवाशांच्या सेवेसाठी नियंत्रक ( कंट्रोलर ) आणा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
यावेळी आमदार देशमुख यांनी नवीन सुरु करण्यात आलेल्या एसटीमधून तेरामैल पर्यंत प्रवास करून प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच नवीन एसटी पूजनावेळी जुनी एसटी बसस्थानकावरच बंद पडल्यामुळे आगायाप्रमुखांना मंद्रूप परीसरात चांगल्या एसटी पाठविण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी सोलापूर मंद्रूप एसटी सेवा सुरळीत असताना सोलापूर आगाराप्रमुखांनी ही सेवा बंद केली. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी सोलापूरला जाणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. म्हणून यापुढे ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे.
      आमदारांच्या पाठपुराव्याला यश
विद्यार्थ्यांना सोलापूरला उच्च शिक्षणासाठी जाण्यास उशीर होत होता. एसटीमधून प्रवास करताना नोकरदार वर्गाला त्रास सहन करावा लागत होता. हा प्रश्न भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांच्याकडे मांडला. आमदारांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि MSRTC प्रशासनाकडे शिफारस केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच MSRTC, सोलापूर विभागाचे विभागीय नियंत्रक आणि सोलापूर डेपो मॅनेजर यांनी नवीन बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोबतच कारकल, तेलगाव, वडापूर या गावांच्या फेऱ्या वेळेवर सोडण्याचे आणि बसस्थानकावर स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेशही दिले आहेत.
….
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे -जिल्हाधिकारी

Next Post

चार महिन्यांतच पदभारासाठी ‘जोडमोटें’ची पडद्यामागून ‘गेम’;

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
चार महिन्यांतच पदभारासाठी ‘जोडमोटें’ची पडद्यामागून ‘गेम’;

चार महिन्यांतच पदभारासाठी 'जोडमोटें'ची पडद्यामागून 'गेम';

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133017

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697