Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

” दुष्काळ जाहीर करा” , अन्यथा तीव्र आंदोलन करणार

अखिल भारतीय किसान सभेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 3, 2026
in सोलापूर
0
” दुष्काळ जाहीर करा” , अन्यथा तीव्र आंदोलन करणार
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उसाला 5,500 रुपयांचा हमीभाव द्या!

दक्षिण सोलापूर :

सोलापूर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने तातडीने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 5 हजार 500 रुपये हमीभाव द्यावा, अशी जोरदार मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत ऊस दर निश्चित होत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात किसान सभा सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उत्पादन खर्च, वाढती महागाई आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करता उसाला 5,500 रुपये दर देणे गरजेचे आहे. शासनाने सन 2025 च्या पिक विम्यातून अक्कलकोट तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे, त्यांना तातडीने विम्याची रक्कम अदा करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शेतकरी आणि पशुधनासमोरील गंभीर संकट लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा अखिल भारतीय किसान सभा शेतकरी हितासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी, दत्ता चव्हाण, जावेद आवटे, तात्यासाहेब व्हनमाने, दयानंद फताटे, भिमाशंकर झळके, शांतकुमार कोळी, स्वामीनाथ शिरगुर, नरेंद्र लोभे, सिकंदर मकानदार, स्वप्नील बणजगोळे, शिवानंद पाटील व बशीर शेख यांच्यासह अनेक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
…….
*नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*

*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*

ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…

* नवप्रभात न्यूज पोर्टल *

*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!

सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.

Previous Post

चार महिन्यांतच पदभारासाठी ‘जोडमोटें’ची पडद्यामागून ‘गेम’;

Next Post

उद्योजक म्हणून यशस्वी व्हा ! जनसेवक महादेव कोगनूरे यांचे तरूणांना आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
उद्योजक म्हणून यशस्वी व्हा ! जनसेवक महादेव कोगनूरे यांचे तरूणांना आवाहन

उद्योजक म्हणून यशस्वी व्हा ! जनसेवक महादेव कोगनूरे यांचे तरूणांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133018

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697