Sunday, September 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधू-वर मेळावा

हवा मल्लिनाथ महाराज करणार उद्घाटन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
September 20, 2026
in सोलापूर
0
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वीरशैव समाजातील विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती

सोलापूर.. वीरशैव लिंगायत समाजातील विवाहेच्छुक तरुण-तरुणींसाठी रविवार २७ सप्टेंबर रोजी सोलापुरात भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जुळे सोलापूर येथील गोविंदश्री मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हा मेळावा होणार असल्याची माहिती संयोजक इरण्णा पनशेट्टी यांनी दिली.  या मेळाव्याचे उद्घाटन आळंद तालुक्यातील निरगुडी येथील श्री श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी राहणार आहेत. या सोहळ्याला कोल्हापूरचे न्यायाधीश विष्णुदास दासरी, संजीवनी मल्टिस्टेट हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत माकम, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील, शिवानंद पाटील, सुरेश झळकी, स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष संजीव पाटील, जि.प. सदस्य विकास बुळ्ळा, माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे, तडवळचे उपसरपंच भीमण्णा ग्वाड्याळ, प्रगतिशील शेतकरी अण्णाराव याबाजी, साधू पाटील यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सध्या अनेक वधू-वर मंडळे व्यावसायिक झाली असताना, इरण्णा पनशेट्टी यांनी हवा मल्लिनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने पूर्णपणे मोफत वधू-वर मंडळ सुरू केले आहे. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी विवाहेच्छुक आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणले. या उपक्रमातून आतापर्यंत शेकडो रेशीमगाठी जुळल्या आहेत.

कोणताही आर्थिक भार न घेता, गरीब-श्रीमंत सर्वांना समान संधी मिळावी हा यामागचा उद्देश आहे. सोलापुरातील हा चौथा मेळावा असून, विवाहेच्छुक वधू-वर आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पनशेट्टी यांनी केले आहे.

____________________

* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

सोलापुरात वीरशैव लिंगायत समाजाचा मोफत वधू-वर मेळावा

September 20, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

शाळांमध्ये दिसणार शासनमान्य शिक्षकेतर कर्मचारी !

September 18, 2026
देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

देवकतेंच्या मदतीला धावले महादेव !

September 18, 2026
अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

अक्कलकोट पंचायत समिती येथून ‘सेवा संकल्प’ बाईक रॅली

September 18, 2026
सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

137268

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697