आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
मंद्रूप.. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे नविन बसस्थानक उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
मंद्रूप ग्रामपंचायतीने बसस्थानकासाठी जागा नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला सक्षम प्राधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. तसेच राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या (MSRTC) संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत ठरावही मंजूर झाला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
मंद्रूप हे तालुक्यातील मोठे बाजारपेठेचे गाव आहे. परिसरातील 15-20 गावातील विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवासासाठी मंद्रूपवर अवलंबून आहेत. सध्या बसस्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. स्वतंत्र बसस्थानक झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या ही फाईल विभागीय कार्यालयात प्रगतीपथावर असून, पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.._______________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*












