पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
सोलापूर …
महर्षी वाल्मिकी हे केवळ एक ऋषी नव्हते, तर ते आद्य कवी, क्रांतीचे प्रतीक होते. त्यांनी रामायणाच्या माध्यमातून जगाला सत्य, त्याग आणि आदर्श जीवनाचा संदेश दिला. वाल्मिकी समाज हा अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक समाज आहे. या समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
आद्य कवी, रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर विनायक दादा कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, नगरसेवक संजय कोळी, दीपक जमादार, नगरसेविका वनिता संतोष पाटील यांच्यासह समाजाचे नेते अरुण भाऊ लोणारे, आप्पासाहेब हिप्परगे, आप्पा प्याटी, माजी नगरसेवक रामदास मगर, शिवा कोळी, नागेश कोळी आदी उपस्थित होते.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














