माहितीपत्रक वाटप करून ऑनलाईन फसवणुकीबद्दल जनजागृती
दक्षिण सोलापूर.. हत्तूर येथील
श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविक-भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशांत वराळे , उदयसिंग साळुंखे व शशी हुंडेकरी यांच्या हस्ते प्रसाद वाटप शुभारंभ करण्यात आला. यावेळी हत्तुरचे प्रतिष्ठित नागरिक अनिल भरले, अब्दुल गनि शेख, भिमाशंकर कनपवडीयर, सिद्धाराम म्हेत्रे , भिमाशंकर सतुबर, जोत्यप्पा सिनेवडीयर, राजकुमार कनपवडियर यांच्यासह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णाप्पा गि. सतुबर व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, हितचिंतक, सभासद व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांच्या सेवेसह सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल श्री सोमेश्वर पतसंस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महाप्रसाद वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने भाविकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले .
यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशांत वराळे , उदयसिंग साळुंखे व शशी हुंडेकरी यांनी उपस्थित भाविकांना वाढत्या सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणुकी (स्कॅम) बद्दल मार्गदर्शन केले. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँकेचे OTP कोणाला देऊ नये, याबाबत त्यांनी जनजागृती केली.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














