शेतकऱ्यांसाठी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयावर निघाला मोर्चा
मंद्रूप: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मंद्रूप तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मंद्रूप बस स्टँड येथून सुरू होऊन तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचला. त्यानंतर आंदोलकांनी तहसील गेटला धक्का देत मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर तहसीलदार विष्णू बुटे यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले..

यावेळी शेतकऱ्यांनी दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, जनावरांसाठी चारा- पाण्याची सोय करावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्या केल्या. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र स्वामी, जिल्हा सचिव सुलेमान शेख, सहसचिव दत्ता चव्हाण, दक्षिण तालुका अध्यक्ष जावेद आवटे, तालुका सचिव भीमाशंकर झळके, दयानंद फताटे, सिकंदर माकानदार यांनी केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














