दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सक्तीची कर्जवसुली थांबवा; कर्जाचे पुनर्गठन करा,
सोलापूर: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि कर्जाचे पुनर्गठन करावे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिल्या आहेत. सक्तीने किंवा जप्तीद्वारे वसुली केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, मायक्रो फायनान्स कंपनी नेटवर्कचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष देवेंद्र शहापूरकर व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुष्काळामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. अशा वेळी कंपन्यांनी संवेदनशीलता दाखवावी. शासनाच्या निर्देशानुसार सक्तीची वसुली थांबवून पात्र कर्जदारांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे. कर्जफेड करू इच्छिणाऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगा. नियमित कर्जफेडीमुळे आर्थिक शिस्त लागते. गरजू पात्र ग्राहकांना कर्जवाटप सुरू ठेवा, त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यास मदत करा. जिल्ह्यात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














