Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिवभक्ती हीच खरी शक्ती – महादेव कोगनुरे

श्री सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळात शिवलीलामृत ग्रंथ प्रवचन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 18, 2026
in सोलापूर
0
शिवभक्ती हीच खरी शक्ती – महादेव कोगनुरे
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 महादेव कोगनुरे, अमर पाटील, सोनाली कडते, प्रशांत कडते यांची उपस्थिती

दक्षिण सोलापूर :
“श्री शिवलीलामृत ग्रंथ हा केवळ ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला आहे. शिवभक्ती माणसाला संकटाशी लढण्याची शक्ती देते. आजच्या तरुण पिढीने आपल्या संस्कृती आणि परंपरेशी जोडले जाणे गरजेचे आहे. सकळेश्वर मंडळाने नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून हा वारसा जपला आहे, हे कौतुकास्पद आहे. एमके फाउंडेशन नेहमीच अशा धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले. मंद्रूप येथील श्री सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित “श्री शिवलीलामृत ” ग्रंथ प्रवचन कार्यक्रमास एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंद्रूप जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील , संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कडते , ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेंडगुदले, मंडळाचे अध्यक्ष अमोगसिद्ध मुंजे, उपाध्यक्ष शिवानंद जोडमोटे, संस्थापक गौरीशंकर मेंडगुदले, सचिव सकळेश्वर पुजारी, निवृत मंडलाधिकारी सुरेश जोडमोटे, वांगीचे प्राचार्य गिरीश कुलकर्णी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

   शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील व जिल्हा परिषद सदस्य सोनाली कडते तसेच प्रशांत कडते यांच्या हस्ते “श्री शिवलीलामृत” ग्रंथ पूजा करण्यात आली .

 यावेळी अमर पाटील म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या युगात  श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रवचन गरजेचे आहे. या प्रवचनामुळे समाजात मानसिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत होते. श्री सकळेश्वर नवरात्र महोत्सव मंडळ प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करून समाजाच्या विकासाचा हातभार लावत आहे . या मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अमर पाटील यांनी केले.

  मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त श्री शिवलीलामृत ग्रंथाचे प्रवचन आयोजित करण्यात येते. या ग्रंथ वाचनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी मंडळाच्या वतीने सोनाली कडते, महादेव कोगनुरे, अमर पाटील व प्रशांत कडते यांचा सत्कार करण्यात आला.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Next Post

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153308

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697