गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले
सोलापूर – कंदलगाव येथील बस स्थानकावर प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारा पिकअप मंद्रूप पोलिसांनी पकडला असून तब्बल २८ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 
अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अशोक यमनप्पा इलागेर, वय ४४ वर्षे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पिकअप वाहन क्र. MH २४ AB ८४५४ थांबवले.
चालकाने आपले नाव राजाभाऊ बालाजी चव्हाण, वय २२ वर्षे, रा. रुपचंद नगर, ता. रेनापूर, जि. लातूर असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू आढळून आली.
त्यामध्ये – विमल पानमसाला ३० पोती – किंमत १३ लाख ६ हजार ८०० रु.
व्ही तंबाखू ०६ पोती – किंमत ४३ हजार ५६०रु.
– विमल पानमसाला १९ पोती – किंमत ४ लाख ३० हजार ९२० रु.
व्ही १ तंबाखू ३ पोती – किंमत ३५ हजार१००रु.
– व्ही १ तंबाखू ५ पोती किंमत ४६ हजार८००रु.
एकूण प्रतिबंधित अन्न पदार्थाची किंमत १८ लाख ६३ हजार १८० रुपये असून, गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन १० लाख रुपये असे एकत्रित २८ लाख ६३ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चालक राजाभाऊ चव्हाण यास प्रतिबंधित मालाच्या पुरवठादाराबाबत विचारणा केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही तसेच खरेदी बिले उपलब्ध नसल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहनासह मुद्देमाल जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे. मंद्रूप पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी अवैध धंदे विरोधात मोहीम उघडली आहे. यामध्ये जुगार, मटका व गुटखा याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. त्यामुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांचे दहावे दणाणले आहेत.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














