दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
सोलापूर जिल्ह्यात दहावीचे ७२ हजार तर बारावीचे ४९ हजार विद्यार्थ्यांना फायदा
सोलापूर – राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या दि. २५ सप्टेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, त्या अंतर्गत ही सवलत लागू करण्यात आली आहे. याबाबत माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुढील सविस्तर सूचना येईपर्यंत पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. परीक्षा शुल्काअभावी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी –
दहावी:
एकूण ७२,१७० विद्यार्थी (३८,७१७ मुले + ३३,४५३ मुली)
बारावी:
एकूण ४९,६६२ विद्यार्थी (२५,९५१ मुले + २३,७११ मुली)
ग्रामीण भाग (तालुकानिहाय दहावी) –
पंढरपूर – ७,९५२ (सर्वाधिक), माळशिरस – ७,३५९, बार्शी – ६,०७५, सांगोला – ५,७२८, माढा – ५,५९७, उत्तर सोलापूर – ५,१५२, अक्कलकोट – ४,७२२, मोहोळ – ४,६०२, दक्षिण सोलापूर – ४,३४३, मंगळवेढा – ३,८२४, करमाळा – ३,३५५. ग्रामीण दहावी एकूण – ५८,७०९.
ग्रामीण भाग (तालुकानिहाय बारावी) –
पंढरपूर – ६,१५७, माळशिरस – ४,९८२, बार्शी – ४,७९१, सांगोला – ४,१५२, माढा – ३,९१८, उत्तर सोलापूर – २,७८८, मोहोळ – २,७६४, मंगळवेढा – २,५५३, दक्षिण सोलापूर – २,५०८, अक्कलकोट – २,४२३, करमाळा – २,०६१. ग्रामीण बारावी एकूण – ३९,०९७.
शहर विभाग –
यूआरसी-१ : दहावी – ७,५८२, बारावी – ५,५८६
यूआरसी-२ : दहावी – ५,८७९, बारावी – ४,९७९
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














