Tuesday, October 27, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दुधासाठी प्लास्टिक कॅन वापरू नका

हॉटेलमधील खाद्यरंगावरही निर्बंध - सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 16, 2026
in सोलापूर
0
तोडणीला आलेला दोन एकर ऊस डोळ्यादेखत भस्मसात
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीस मनाई,

नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

सोलापूर,.. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅनचा वापर टाळा आणि हॉटेलमधील तयार अन्नात अनावश्यक खाद्यरंग वापरू नका, असे कडक आवाहन सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.
दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅनचा वारंवार वापर केल्यास प्लास्टिकमधील घातक घटक दुधात मिसळण्याची शक्यता असते. यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक संस्था, संकलन केंद्रे आणि वाहतूकदारांनी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचा वापर करावा.
हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज सेंटर आणि बिर्याणी विक्रेत्यांनी ग्राहकांच्या आरोग्यासाठी खाद्यरंगाचा वापर करू नये. फक्त स्वीट आणि बेकरी पदार्थांसाठी मर्यादित प्रमाणात (१०० PPM पर्यंत) परवानगी असून त्यासाठीही नियम पाळणे बंधनकारक आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात जास्त साखर, मीठ आणि तेल असलेल्या पदार्थांच्या विक्री व उत्पादनावर मनाई करण्यात आली आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. प्लास्टिक कॅन वापरणारे दूध विक्रेते, नियमबाह्य रंग वापरणारे हॉटेल चालक आणि शाळेजवळ जंक फूड विकणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

महसूल सहाय्यकांना “नायब तहसीलदार” पदाची संधी द्या

Next Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
माध्यमिक शिक्षण विभागाचा “आॅनलाईन कामकाज”,

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

जाणून घ्या, पदवीधर आणि शिक्षक आमदार मतमोजणी पद्धत

October 26, 2026
महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

महर्षी वाल्मिकी जयंती सोलापुरात उत्साहात

October 26, 2026
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री सोमेश्वर पतसंस्थेचा महाप्रसाद

October 23, 2026
कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

कंदलगाव येथे २८ लाखांचा गुटखा जप्त

October 22, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

सोलापुरात निघाली “बांगडी” म्हशीची अंत्ययात्रा

October 22, 2026
खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

खत खरेदी-विक्रीसाठी QR कोड बंधनकारक

October 21, 2026
किसान सभेचे ठिय्या आंदोलन

किसान सभेचे ठिय्या आंदोलन

October 20, 2026
जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

जप्ती केल्यास कठोर कारवाई ! जिल्हाधिकारी यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दम

October 19, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

153308

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697