Thursday, November 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
November 3, 2026
in सोलापूर
0
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार
0
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी सत्यमेव वॉटर कप स्पर्धा प्रभावी ठरणार

सोलापूर.. सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२६-२७ च्या माध्यमातून लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. पाणी फाउंडेशनला जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे सहकार्य देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले. जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, जिल्हा समन्वयक सुशांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता दीपक लांडगे, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, डीआरडीएचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप उपस्थित होते.

डॉ. अविनाश पोळ यांनी स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, वॉटर कप स्पर्धा १०० गुणांची असून यामध्ये जलसंधारण कामांना ७० गुण तर गट शेतीला ३० गुण असतील. गावांची निवड तसेच पाणी आणि जलसंधारणा विषयी जागरूक असलेल्या नागरिकांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जलसंधारण चळवळीत मनापासून योगदान देण्याची इच्छाशक्ती असलेल्या नागरिकांना पाणी फाउंडेशनमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण डिसेंबर २०२६ अखेर किंवा १५ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.
प्रशिक्षणानंतर गावातील शिवार फेरीला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवार फेरीच्या माध्यमातून पाण्याचे स्रोत, पाणलोट क्षेत्र आणि जलसंधारणासाठी आवश्यक कामांचे प्रत्यक्ष नियोजन करता येईल.
सोलापूर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती असून मोठ्या प्रमाणावर जलसंधारण कामांची आवश्यकता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता वाढवावी, असे आवाहनही डॉ. पोळ यांनी केले.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

Next Post

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

"सभापती व बिडीओ" यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची "गैरसोय" होणार दूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161049

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697