Thursday, November 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
November 11, 2026
in सोलापूर
0
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाजकल्याण अधिकारी सोनवणे यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनुदानित वसतिगृहांच्या प्रस्तावांच्या छाननी प्रक्रियेत कथित अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनी प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणाची दखल घेत, समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक मल्लिकार्जुन मळगे यांना समाजकल्याण अधिकारी सागर सोनवणे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र मळगे यांच्या कार्यकाळात वितरित केलेल्या वसतिगृह अनुदानासंदर्भात चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी छावा संघटना व मानवाधिकार संरक्षण फेडरेशन यासह विविध संघटनांनी केली आहे.
याबाबत संघटना व पालकांनी तक्रार केल्यानंतरही समाज कल्याण विभागाचे तत्कालीन प्रभारी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले व कनिष्ठ लिपिक मल्लिकार्जुन मळगे यांनी नियमबाह्य अनुदान वाटप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
मल्लिकार्जुन मळगे यांच्या कामकाजाबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आले होते . या तक्रारीत जिल्ह्यातील १५० हून अधिक अनुदानित वसतिगृहांच्या प्रस्तावांच्या छाननी प्रक्रियेतील त्रुटी आणि अनियमिततेकडे लक्ष वेधण्यात आले. वसतिगृहांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी न करणे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची खातरजमा न करणे तसेच संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी न करताच, प्रस्तावांवर पुढील कार्यवाही केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शासनाच्या निर्धारित निकषांनुसार पात्रता नसतानाही, काही प्रस्ताव केवळ कागदोपत्री पुढे पाठवले जात असल्याचा दावा करण्यात आला. इतकेच नव्हे, तर काही वसतिगृहांच्या इमारतींसंदर्भात संशयास्पद आणि कथित बोगस कागदपत्रांचा वापर करून, शासकीय अनुदान मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता कनिष्ठ लिपिकाला वस्तीग्रहांचे चौकशी करून अनुदान करण्याचा अधिकार नसताना कनिष्ठ लिपिक मळगे यांनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संगनमत करून जिल्ह्यातील वसतिगृहांना अनुदान वाटप केला आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारदारांवर दबाव तंत्राचाही वापर करण्यात  करण्यात आला आहे. त्यामुळे समाज कल्याण अधिकारी यांनी जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांची उलट तपासणी करून कनिष्ठ लिपिक मळगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161049

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697