Thursday, November 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
November 9, 2026
in सोलापूर
0
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एसटी प्रवास सवलतीबाबत मोठी बातमी 

मुंबई:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटी बस प्रवासात सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी महिला प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) अनिवार्य करण्याची अट ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. महामंडळाच्या वाहतूक विभागाने अधिकृत परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
यापूर्वी १ ऑक्टोबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, अनेक तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींमुळे महिला प्रवाशांना या अटीमधून तात्पुरती सूट देण्यात आली आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १.१० कोटी NCMC कार्ड्सची नोंदणी व वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक महिला प्रवाशांना या योजनेची पुरेशी माहिती नसल्याने, मोठ्या संख्येने महिलांनी अजूनही कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन महिला लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ०७ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी ही सक्ती शिथिल करण्यात आली आहे.
या वाढीव कालावधीत सर्व महिला प्रवाशांचे NCMC कार्ड तयार व्हावे, यासाठी महामंडळाने विशेष मोहीम आखली आहे. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जातील.
या शिबिरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग घेतला जाईल.
३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के महिला प्रवाशांची कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामंडळाने सर्व महिला प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी या शिथिलतेच्या कालावधीचा लाभ घेऊन आपले NCMC कार्ड त्वरित नोंदवून घ्यावे, जेणेकरून भविष्यात प्रवासादरम्यान सवलतीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

Next Post

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व "पॅनल प्रमुखांची" छुपी युती ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161049

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697