Thursday, November 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

एम. के. फाउंडेशनचे महादेव कोगनूरे यांच्या कार्याचे कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
November 7, 2026
in सोलापूर
0
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बहुरूपी नगरमध्ये गरजूंना दिवाळी शिधा किट

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसमोर सण साजरा करण्याचे आव्हान निर्माण झाले असतानाच, दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा या सामाजिक बांधिलकीतून एम. के. फाउंडेशनच्या वतीने बहुरूपी नगर, विजापूर रोड येथे गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागातही या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

     यावेळी बहुरूपी नगरमधील मल्लेश सूर्यवंशी, बसवराज सितारे, सुभाष सितारे, कल्लाप्पा तेले, एम के फाउंडेशनचे अजित पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व फाउंडेशन परिवाराचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद निर्माण व्हावा, या उद्देशाने शिधा किट तयार करण्यात आले होते. गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवताना त्यांच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा विचार करण्यात आल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.
यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी आहे. केवळ सणाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा गरजूंच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नसून, दुसऱ्याच्या घरातही आनंदाचा दिवा पेटवण्यात आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

Next Post

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161049

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697