Thursday, November 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
November 3, 2026
in सोलापूर
0
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना

सोलापूर :
मंगळवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकाला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शौचालयासह अनेक ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य आढळून आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. पाहणी दरम्यान या ठिकाणी दोन मिनिट थांबल्यावर मला दुर्गंधीचा त्रास होत आहे तर प्रवासी दिवस रात्र कसे थांबत असतील? अशा कडक शब्दात परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक सुविधांच्या पूर्ततेवर विशेष भर द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिले.
मंत्री सरनाईक यांनी स्वच्छतागृहे, पाणपोई आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी केली. बसस्थानकातील स्वच्छतेच्या बाबतीत अद्याप सुधारणा करण्यास मोठा वाव असून, बसस्थानक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील प्रवाशांशी थेट संवाद साधला. एसटीच्या नवीन बसेसबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशीच दर्जेदार सेवा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी प्रवाशांनी स्थानिक समस्याही मंत्री महोदयांसमोर मांडल्या. प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार !

Next Post

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161049

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697