Thursday, November 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
November 9, 2026
in सोलापूर
0
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?
0
SHARES
290
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१४ सदस्यांच्या अविश्वासाने उलट-सुलट चर्चांना उधाण

दक्षिण सोलापूर :
मंद्रूप ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्याविरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावामुळे गावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. १४ सदस्यांनी एकाच वेळी एकत्र येणे ही सामान्य घटना नसून, यामागे मंद्रूपमधील सर्वच पॅनल प्रमुखांची एकजूट असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अप्पाराव कोरे, मळसिद्ध मुगळे व मोतीलाल राठोड यांच्यासह इतर पॅनल प्रमुखांचे वेगवेगळे गट सक्रिय आहेत. मात्र उपसरपंच हटवण्याच्या मुद्द्यावर हे सर्व विरोधी पॅनल प्रमुख एकाच छताखाली आले का ? असा सवाल उपस्थित होत आहे. जर सर्व पॅनल प्रमुखांची युती झाली असेल तर सत्ताधाऱ्यांनी उपसरपंच व्हनमाने यांचे राजीनामा घेऊन पदावरून दूर करणे अपेक्षित आहे.
दुसरीकडे, केवळ उपसरपंच हेच टार्गेट का? सरपंच नव्हे? या अविश्वासामागे खुर्चीचे राजकारण आहे की पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावरून आलेले अपयश? यावर गावात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. १४ सदस्यांचा हा आकडा सत्ताबदलाची नांदी तर नाही ना? की हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे? याकडे संपूर्ण मंद्रूपचे लक्ष लागले आहे. मंद्रूपची जनता दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने त्रस्त असताना, जनतेचे प्रतिनिधी असलेले ग्रामपंचायत सदस्य मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्याऐवजी अविश्वास ठरावाच्या राजकारणात व्यस्त असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
गावात खंडित पाणीपुरवठ्या मुळे अबाल वृद्ध पाण्यासाठी म्हणून भटकत आहेत. १४ ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्याविरोधात अविश्वास दाखल करण्यातच शक्ती खर्च केल्याची टीका होत आहे. मंद्रूप ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान व्हनमाने यांच्याविरोधात १४ सदस्यांनी सोमवारी तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. यामध्ये सुरेश टेळे, सूर्यकांत मेंडगुदले, संगीता मेंडगुदले, यासीन मकानदार, बेबीजान लिगेवान, शांताबाई चव्हाण, शिवपुत्र जोडमोठे, शिवानंद लोभे, पार्वती काळे, चुंगाबाई खाडे , संजय कांबळे, रियाना शेख, सुनंदा मुगळे, शकुंतला शिळे यांचा समावेश आहे. सुधाकर कोरे व अंकिता कुंभार या दोन सदस्यांनी यापासून अलिप्त राहणे पसंत केले.
उपसरपंच कामकाजात विश्वासात घेत नाहीत, सरपंचांच्या निर्णयाला विरोध करत नाहीत आणि वारंवार अनुपस्थित राहतात, अशी कारणे नमूद करण्यात आली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणी नाही. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असताना, सदस्यांनी राजकीय कुरघोडीत वेळ घालवणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. “आधी पाणी द्या, मग राजकारण करा,” असा संतप्त सवाल मंद्रूपकर करत आहेत.

पॅनल प्रमुखांची भूमिका गुलदस्त्यात

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या सत्तेचे प्रमुख शिल्पकार असलेले पॅनल प्रमुख अप्पाराव कोरे , मळसिद्ध मुगळे आणि मोतीलाल राठोड यांचा सदस्यांवर वचक राहिला नसल्याची चर्चा गावात रंगली आहे. १४ सदस्यांनी एकाच वेळी बंड करत थेट उपसरपंचावर अविश्वास दाखल करणे, ही साधी घटना नाही. एवढा मोठा निर्णय घेताना पॅनल प्रमुखांना विश्वासात घेतले होते का? की पॅनल प्रमुखांच्याच आशीर्वादाने हे बंड झाले? याबाबत कोरे, मुगळे आणि राठोड यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असताना, पॅनल प्रमुखांनी सदस्यांना समज देऊन पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता सदस्य अविश्वासात व्यस्त राहिल्याने, पॅनल प्रमुखांचे नियंत्रण सुटले की त्यांनीच डोळेझाक केली, असा सवाल उपस्थित होत आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

Next Post

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026
सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

सोलापूर बसस्थानकाच्या स्वच्छतेवरून परिवहन मंत्री संतापले

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161049

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697