मंद्रूपमध्ये 20 हजार 762 शेतकऱ्यांना 10 कोटी 38 लाख रुपये वाटप
दक्षिण सोलापूर ..राज्य सरकारने जाहीर केलेली दुष्काळ नुकसान भरपाईची 5000 रुपये अग्रीम रक्कम दोन नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत 43 गावांमधील 20,762 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 10 कोटी 38 लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विष्णू बुटे यांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार अश्विनी दराडे उपस्थित होते.
यंदा पावसाने दगा दिल्याने दक्षिण सोलापूरमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी पेरलेली मका, बाजरी, उडीद, सोयाबीन, भुईमूग पिके उगवूनही पावसाअभावी करपून गेली. 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत जाहीर करण्यात आले आहे.
दोन व तीन नोव्हेंबर स्वतंत्र खाते असलेल्या शेतकऱ्यांना वाटप तर तीन पाच नोव्हेंबर पर्यंत सामाईक क्षेत्र व संमती दिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी मंद्रूप वापर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार , तीन मंडल अधिकारी , 20 तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांच्यासह कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी या सर्वांनी कामकाज केल्यामुळे शेतकऱ्यांना पाच नोव्हेंबर पर्यंत नुकसान भरपाई रक्कम मिळण्यास मदत होत असल्याचे तहसीलदार विष्णू बुटे यांनी सांगितले.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*













