Friday, November 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
November 12, 2026
in सोलापूर
0
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२५ नोव्हेंबर पर्यंत पंचायत समितीकडे अर्ज करा!

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध शेती उपयोगी यंत्रसामग्री व कृषी औजारे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत पीक संरक्षणासाठी थ्री पिस्टन स्प्रे पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, कृषी अभियांत्रिकी अंतर्गत रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, सिंचनासाठी ५ एचपी सबमर्सिबल विद्युत पंप संच, डिझेल इंजिन तसेच कडबाकुट्टी, ताडपत्री व स्लरी फिल्टर या साहित्याचा समावेश आहे.
सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, अत्यल्पभूधारक, दिव्यांग व महिला शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, आठ-अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी जात प्रमाणपत्र, तर दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांची निवड कृषी समितीमार्फत करण्यात येणार असून, निवड झाल्यानंतर एका महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून पसंतीच्या कृषी औजाराची खरेदी करावी लागेल. खरेदी करण्यात येणारी यंत्रसामग्री अधिकृत सक्षम तपासणी संस्थेने तपासलेली तसेच बीआयएस मानांकित असणे बंधनकारक आहे. मंजूर अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. २५ नोव्हेंबर पर्यंत पंचायत समिती कार्यालयातील कृषी विभागाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे.
______________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294

Previous Post

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान

November 12, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161344

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697