Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा

गौराबाई व्हनमाने फार्म हाऊसवरील केळीची होतेय चर्चा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 9, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूपच्या केळीला रशियात मागणी

सोलापूर… दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील हुवण्णा सिध्दप्पा व्हनमाने यांच्या शेतातील जी९ केळीला रशियाच्या बाजारपेठात मागणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आठ टन केळीची निर्यात करण्यात आली आहे . मंद्रूप येथील केळीचे व्यापारी जाफर बागवान यांनी रशिया येथील कंपनीशी समन्वय साधून व्हनमाने यांची केळी रशियाला पाठविली आहे . त्यामुळे मंद्रूपमधील शेतकर्‍याची केळी रशियाच्या बाजारपेठेत पोहोचल्याने सचिन अंकुश व्हनमाने या तरूण शेतकर्‍यामुळे मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

रशिया येथे जी९ केळीला पंधरा रुपये दर मिळत असल्यामुळे व्हनमाने यांनी रशियाला केळी पाठवण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार मंद्रूप ची केळी रशियाला पोहोचल्याने मंद्रूपच्या शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जानेवारी २०२५ मध्ये हुवण्णा व्हनमाने यांच्याबरोबर त्यांचे नातू सचिन व्हनमाने यांनी जी९ केळी लागवड करून शेतकरीमित्र राजकुमार घाटे यांच्याकडून मार्गदर्शन घेतला. यावेळी घाटे यांनी वारंवार केळी बागेला भेट देऊन औषध फवारणी व अंतरमशागत बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सचिन व्हनमाने यांनी सर्व रोगांपासून केळी बागेचे संरक्षण करीत केळी बागेची उत्तम निगा राखली. त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी त्यांची केळी पाहणी केल्यानंतर रशियाच्या व्यापार्‍याकडून केळी पाठविण्यास सांगण्यात आले. पहिल्या टप्यात साडे आठ टन केळी काढण्यात आली असून पंधरा रूपये किलोप्रमाणे विक्री करण्यात आली आहे. आणखी दोन टप्यात पंधरा ते वीस टन केळी उत्पादन निघणार आहे. एक वर्षात दीड लाख रूपये खर्च करून केळी लागवड केल्यानंतर चार ते पाच लाख उत्पन्न मिळाल्याने व्हनमाने परिवारामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. व्हनमाने यांच्या शेती क्षेत्रातील यशाबद्दल माळकवठे मठाचे श्री पंचाक्षरी महास्वामीजी, उपसरपंच भगवान व्हनमाने, दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे व मंद्रूपचे कृषी सहायक रमेश फरतडे तसेच बार्शी येथील राठोड बायोटेकचे गणेश राठोड यांनी अभिनंदन केला आहे.

Previous Post

या नवीन रस्त्यावरून जाणार मंद्रूपच्या पालख्या

Next Post

सोलापूर शहराच्या विकासासाठी बारामती पॅटर्न राबविणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर शहराच्या विकासासाठी बारामती पॅटर्न राबविणार

सोलापूर शहराच्या विकासासाठी बारामती पॅटर्न राबविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133031

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697