Thursday, July 2, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

या नवीन रस्त्यावरून जाणार मंद्रूपच्या पालख्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 8, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
550
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार सुभाष देशमुख यांनी मंजूर केला दहा लाख निधी

सोलापूर.. मंद्रूप येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात मकरसंक्रांत दरम्यान होणार्‍या मळसिध्द मंदिराच्या यात्रेसाठी

मलकारसिध्द मंदिरापासून नेहरू चौकापर्यंतच्या रस्त्यावरून देवाच्या पालख्या जातात. म्हणून
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूपमधील वाॅर्ड क्रमांक तीनमधील या
सिमेंट काँक्रेट रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर केला आहे . त्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन वार्ड क्रमांक तीन मधील ग्रामपंचायत सदस्य व मळसिध्द मंदिराचे पुजारी अमोगसिध्द पुजारी, शिलीसिध्द पुजारी यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत सदस्य सुरेश मेंडगुदले , भाजपाचे गौरीशंकर मेंडगुदले, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ व सुमित मेंडगुदले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .

दरवर्षी १२ ते १६ जानेवारी दरम्यान मंद्रूप येथील श्री मळसिध्द देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मलकारसिध्द मंदिरापासून मिरवणूकीस सुरूवात होऊन तैलाभिषेक, होम प्रदीपन व शोभेचे दारूकाम या दिवशी मानाच्या पालख्या जातात. त्यासाठी मलकारसिध्द मंदिरापासून नेहरू चौकापर्यंत भक्तांची मोठी वर्दळ सुरू असते. यापूर्वी या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य होते. तसेच रस्त्यावरील दगड व मातीमुळे पालख्या घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात त्रास होत होते. त्यामुळे मळसिध्द मंदिराच्या पुजारी यांनी गौरीशंकर मेंडगुदले यांच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आमदार सुभाष देशमुख यांनी मळसिध्द यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी तात्काळ दहा लाख रूपये निधी मंजूर करून सिमेंट काॅंक्रीट रस्त्याला सुरूवात केल्याने पुजारी व भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी मोतीलाल राठोड, रामचंद्र वाडकर, सुरेश स्वामी, निलेश हेळकर, सुरेश पाटील, शिवराज कालदे, मळसिध्द पुजारी, दयानंद ख्याडे, बिळेणी सुंटे, सिध्दाराम काळे, शिवानंद लोभे, शिवपुत्र जोडमोटे, सिकंदर आवटे, ,इक्बाल आवटे, सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.

Previous Post

होटगी येथील बेनक गणपती मंदिराचे जीर्णोध्दार

Next Post

मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

मंद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंगाधर बिराजदार यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव , शेतीमधील उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाकडून दखल

गंगाधर बिराजदार यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव , शेतीमधील उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाकडून दखल

July 1, 2026
३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक