दक्षिणच्या बीडीओंनी घेतला पुढाकार
दक्षिण सोलापूर…
दहा महिन्यापासून बदली होऊनही मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांचा रखडलेला पदभार कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्यात आला. दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सोमवारी ६ एप्रिल रोजी ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांना पदभार सोडण्याचे आदेश दिले. विस्तार अधिकारी युसुफ पठाण यांच्या समक्ष ग्रामसेवक जोडमोटे यांच्याकडून कुशाबा इंगळे यांच्याकडे पदभार हस्तांतर केला.
जून महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्ह्यातील ८४ ग्रामसेवकांची बदली केली होती. यावेळी मंद्रूपचे प्रभारी ग्रामसेवक नागेश जोडमोडे यांचीही बदली झाली असताना ते राजकीय दबाव आणून पदभार देण्यास तयार नव्हते. बदली झालेले ग्रामसेवक कुशाबा इंगळे दोन वेळा पदभार घेण्यासाठी मंद्रूपला आले असतानाही ग्रामपंचायत सदस्यांनी पदभार न देताच त्यांना परत पाठवले होते . दक्षिणचे बीडीओ मनोज राऊत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सोमवारी सहा एप्रिल रोजी नागेश जोडमोटे यांचे पदभार काढून कुशाबा इंगळे यांच्याकडे हस्तांतर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार विस्तार अधिकारी युसुफ पठाण यांनी उपस्थित राहून पदभार हस्तांतरण प्रक्रिया पार पडले .
…
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मंद्रूपचे ग्रामसेवक जोडमोटे यांची बदली केली होती. मात्र शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांमुळे पदभार प्रक्रिया प्रलंबित होती. यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला होता . मात्र हस्तांतर रखडले होते. त्यामुळे सोमवारी सहा एप्रिल रोजी पदभार हस्तांतरण प्रक्रीया पार पडली .
….
ग्रामसेवक जोडमोटे हे स्थानिक असल्यामुळे मनमानी कारभार करीत होते. निंबर्गी सजा असल्यामुळे मंद्रूप ग्रामपंचायत कार्यालयात क्वचितच दिसत होते. त्यामुळे ग्रामपंचायत कारभारामध्ये अस्ताव्यस्तपणा आला आहे. शिवाय कामकाजाविषयीही नाराजी आहे. म्हणून ग्रामसेवक इंगळे यांनी पारदर्शक कारभार करून मंद्रूपच्या विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
….
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









