Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

या समाजाच्या विकासासाठी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शासनाकडे केला पाठपुरावा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 10, 2026
in सोलापूर
0
या समाजाच्या विकासासाठी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शासनाकडे केला पाठपुरावा
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी उपमहापौर राजेश काळे यांचे ब्राम्हण समाजासाठी भरीव योगदान

सोलापूर.. माजी उपमहापौर राजेश काळे यांनी सर्वसमाज घटकांना सोबत घेऊन विकासकामे करताना ब्राम्हण समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी त्यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. परशुराम वित्त महामंडळ, उद्यानाला आनंदीबाई जोशी नाव देणे यासह विविध माध्यमातून समाजासाठी भरीव काम केला आहे.

परशुराम वित्त महामंडळाचा प्रस्ताव
ब्राह्मण समाजातील तरुणांना शिक्षण, स्वयंरोजगार, उद्योग व कौशल्य विकासासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी परशुराम वित्त महामंडळाचा प्रस्ताव महाराष्ट्रात सर्वप्रथम सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात माजी उपमहापौर राजेश काळे यांनी मांडला. हा प्रस्ताव सर्वसाधारण नव्हता, तर ब्राह्मण समाजाच्या दीर्घकालीन प्रगतीचा दूरदृष्टीने विचार करून तयार करण्यात आला होता. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यामुळे ब्राह्मण समाजातील अनेक तरुणांसाठी विकासाचे नवे दालन खुले झाले.
जानकी नगर उद्यानास आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय
प्रभाग क्रमांक 24 मधील जानकी नगर उद्यानास भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, क्रांतिकारक व प्रेरणास्थान असलेल्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे नाव देण्यात यावे, हा प्रस्तावही माजी उपमहापौर राजेश काळे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात मांडला. महिलाशिक्षण, समाजसुधारणा व ब्राह्मण समाजाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान या उद्देशाने मांडलेल्या या प्रस्तावाला देखील सभागृहाची मंजुरी मिळाली. यामुळे एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे नाव सार्वजनिक ठिकाणी अजरामर झाले.
ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व ऐतिहासिक योगदानाची योग्य ती दखल शासनदरबारी घेतली जावी, समाजाच्या कार्याची अधिकृत नोंद व्हावी, यासाठी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सभागृहात विषय मांडणे, प्रशासनाशी संवाद, विविध पातळ्यांवर समन्वय साधणे अशा माध्यमातून त्यांनी अथक परिश्रम घेतले.
माजी उपमहापौर राजेश काळे यांचे कार्य केवळ प्रस्ताव मांडण्यापुरते मर्यादित नव्हते, तर समाजाच्या भविष्याचा विचार करून उचललेली ठोस पावले होती. ब्राह्मण समाजातील तरुणांना संधी, समाजाला सन्मान आणि इतिहासाला योग्य स्थान मिळवून देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे व प्रभावीपणे केले. त्यामुळे सर्वसमावेशक व सर्वांगिण विकासासाठी प्रभाग २४ मधील शिवसेनेचे अधिकृत अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील उमेदवार उषा राजेश काळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

Previous Post

सोलापूर शहराच्या विकासासाठी बारामती पॅटर्न राबविणार

Next Post

या भूमिपूत्रामुळे दक्षिण तालुक्याची सर्वत्र चर्चा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
या भूमिपूत्रामुळे दक्षिण तालुक्याची सर्वत्र चर्चा

या भूमिपूत्रामुळे दक्षिण तालुक्याची सर्वत्र चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133031

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697