Monday, June 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 12, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन 

मुंबई.. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या सोमवारी दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

    आशा भोसले यांचे अवयव निकामी होत गेले, त्यामुळे त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उद्या सकाळी ११ ते २ या वेळेत त्या लोअर परळ या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली.
सांगली या ठिकाणी आशा भोसले यांचा जन्म झाला होता. वयाच्या १० व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. गिनीज बुकमध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका अशी त्यांची नोंद झाली आहे. आपल्या वेगळ्या आवाजाची भुरळ सगळ्या जगाला पडली होती. त्या जरी आपल्याला सोडून गेल्या असल्या तरीही त्यांचं गाणं कायमच आपल्या सोबत राहणार आहे. तो आवाज कायमच आपल्याला साथ देईल यात शंका नाही. गायिका आशा भोसले यांना विनम्र अभिवादन !

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शिक्षकांनी ज्ञान देणारे ‘टीचर’ न राहता संस्कारांचे वाहक आणि समाजाचे दिशादर्शक ‘गुरू’ बनावे,

Next Post

हत्तूरच्या स्वामी समर्थ परीवारामुळे २६७ ऊसतोड कामगारांना मिळणार शासनाच्या विविध योजनांचे लाभ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026
“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

June 14, 2026
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक