Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिक्षकांनी ज्ञान देणारे ‘टीचर’ न राहता संस्कारांचे वाहक आणि समाजाचे दिशादर्शक ‘गुरू’ बनावे,

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 12, 2026
in सोलापूर
0
शिक्षकांनी ज्ञान देणारे ‘टीचर’ न राहता संस्कारांचे वाहक आणि समाजाचे दिशादर्शक ‘गुरू’ बनावे,
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वालचंदमध्ये ‘टीचर वेलनेस रिट्रीट २०२६’ उत्साहात

सोलापूर : शिक्षकांनी केवळ ज्ञान देणारे ‘टीचर’ न राहता संस्कारांचे वाहक आणि समाजाचे दिशादर्शक ‘गुरू’ बनावे, यासाठी अंतर्मनाची शुद्धी, संयम आणि सजगता अत्यावश्यक आहे, असा मोलाचा संदेश ‘टीचर वेलनेस रिट्रीट २०२६’ या उपक्रमातून देण्यात आला. स्व. भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त वालचंद शिक्षण समूहाच्या नूतन परिसरात आयोजित या रिट्रीटला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सध्याच्या शिक्षणपद्धतीवर भाष्य करताना, शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानानुसार गुरूचे आचरण, चारित्र्य आणि राष्ट्रनिष्ठा ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. समर्पण, जबाबदारी, शांतता, संयम आणि उत्साह या गुणांनी संपन्न शिक्षकच समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो, यावर मुनीश्रींनी भर दिला.
दैनंदिन धावपळीच्या जीवनात शिक्षकांनी थोडा ‘विराम’ घेत आत्मपरीक्षण करणे आवश्यक असून, शांत आणि स्थिर मनच विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊ शकते.
मुनिश्री वीरसागर महाराजांनी सांगितले की, शिक्षकाचे मन सतत जागृत, सजग आणि सकारात्मक विचारांनी समृद्ध असावे. अंतर्मनातील नकारात्मकता, कलुषता आणि मानसिक अडथळे दूर केल्याशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात प्रभावी योगदान देऊ शकत नाही. त्यांनी पंचेंद्रियांबरोबर मन या सहाव्या इंद्रियाच्या शुद्धतेचे महत्त्वही अधोरेखित केले. समारोपप्रसंगी ‘पाच डब्ल्यू’ का, कसे, किती, कोणते आणि कोठे यांचा सजग वापर करून प्रत्येक कृती अर्थपूर्ण व उद्देशपूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. भारतीय संस्कृतीच्या मूल्यांनुसार आत्मसंयम, करुणा आणि विवेक यांच्या आधारावरच शिक्षक यशस्वी व जबाबदार नागरिक घडवू शकतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या वेळी वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, पराग शहा, ब्रिजेश गांधी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार, सोमपा सभागृह नेते नरेंद्र काळे, प्रा. केशव शिंदे, प्राचार्य डॉ. विजय उबाळे आणि डॉ. श्रीरंग क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

….

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

संविधान देशाचा आत्मा… शंकर पाटील

Next Post

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक