Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

संविधान देशाचा आत्मा… शंकर पाटील

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 12, 2026
in सोलापूर
0
संविधान देशाचा आत्मा… शंकर पाटील
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संविधानाच्या संरक्षणासाठी लोक लढा उभारण्याची गरज 

सोलापूर: 
संविधान हा या देशाचा आत्मा आहे. महात्मा बुद्ध, महात्मा बसवण्णा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हाच संविधानिक मूल्यांचा पाया आहे. मात्र धर्म केंद्रित राजकारण करणाऱ्यांकडून संविधानाला धोका निर्माण झाल्याचे सांगतानाच संविधानाच्या संरक्षणासाठी लोकलढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शंकर पाटील यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वसुंधरा महाविद्यालयात आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत पाटील बोलत होते. ‘जातविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना : महात्मा बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान’ या विषयावर पाटील यांनी भारतीय समाज व्यवस्था, समाजभान आणि आजची जबाबदारी असा पट सविस्तराने मांडला.
महात्मा बसवंणानी 12 व्या शतकात समग्र परिवर्तनाची क्रांती केली. बसवंनानी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. जन्माच्या आधारावरील श्रेष्ठत्व नाकारून समतेची शिकवण दिली. कायकवे कैलास ही जीवन पद्धती सांगितली. म्हणजे श्रम हेच देव. श्रमाधिष्ठित जीवन पद्धती सांगितली. कामाला पूजेचे पावित्र्य दिले. दुर्दैवाने आजची व्यवस्था पूजा करणे हेच काम मानणारी आहे. कर्मकांडांचे उदात्तीकरण अतिशय नियोजनबद्धपणे सुरू असल्याची खंत ही पाटील यांनी व्यक्त केली. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पक्षांनीही धर्मनिरपेक्ष भूमिकेशी प्रतारणा केल्याने गांधींच्या पक्षात असलेले गांधींच्या मारेकऱ्यांच्या पक्षात सहज मिसळून जात असताना आपल्याला दिसत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ नेते तथा शाहू परीवाराचे प्रमुख प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे होते.
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. एम आर कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
संविधान पूर्वपीठीकेच्या वाचनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड,नामदेव पवार, प्रशांत बाबर, ज्येष्ठ विधीज्ञ मेत्रस, राजू मानकर यांच्यासह जुळे सोलापूर परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थ्यांनी दिली भेट

Next Post

शिक्षकांनी ज्ञान देणारे ‘टीचर’ न राहता संस्कारांचे वाहक आणि समाजाचे दिशादर्शक ‘गुरू’ बनावे,

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शिक्षकांनी ज्ञान देणारे ‘टीचर’ न राहता संस्कारांचे वाहक आणि समाजाचे दिशादर्शक ‘गुरू’ बनावे,

शिक्षकांनी ज्ञान देणारे ‘टीचर’ न राहता संस्कारांचे वाहक आणि समाजाचे दिशादर्शक ‘गुरू’ बनावे,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक