Saturday, September 26, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अरूण डोंगरे अमरावतीचे ‘राज्य सेवा हक्क आयुक्त’

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 8, 2026
in सोलापूर
0
अरूण डोंगरे अमरावतीचे ‘राज्य सेवा हक्क आयुक्त’
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रशासकीय दांडगा अनुभवाचा अमरावतीच्या  नागरीकांना मिळणार वेळेत शासकीय सेवा 

सोलापूर…. कधीकाळी अमरावती विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे आणि आपल्या कामाची छाप सर्वसामान्यांवर सोडणारे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी अरुण डोंगरे यांची आता ‘आयुक्त, राज्य सेवा हक्क, अमरावती’ या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डोंगरे यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि सर्वसामान्यांना वेळेत सेवा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

७ जानेवारी १९९१ रोजी अमरावती विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या अरुण डोंगरे यांनी मंगरूळपीर, मूर्तिजापूर, दारव्हा आणि अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर अमरावतीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपायुक्त (महसूल) म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. अमरावती महापालिका आयुक्त असताना त्यांनी ‘ऑनलाइन बिल्डिंग परमिशन’ सुरू करून भ्रष्टाचाराला लगाम लावला होता. स्वच्छ भारत अभियानमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी जिल्ह्याला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून दिला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता.

नांदेडचे जिल्हाधिकारी असताना जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवून टंचाईवर मात केली. तसेच मोठे कॅन्सर डिटेक्शन शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी असताना भाडेकरूंचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि त्यांना वेळेवर भाडे मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून घेतले.

राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त म्हणून अरुण डोंगरे आता सामान्य जनतेला शासनाकडून मिळणाऱ्या सेवा (उदा. दाखले, परवाने) वेळेत मिळतात की नाही, यावर नियंत्रण ठेवतील. शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत सेवा न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. एखादा विभाग टाळाटाळ करत असेल, तर नागरिक आयुक्तांकडे दाद मागू शकतात. सरकारी  कामात पारदर्शकता आणणे आणि ‘लोकशाही’ खऱ्या अर्थाने राबवणे हे त्यांचे मुख्य कार्य असेल.
अरुण डोंगरे यांनी साईबाबा संस्थान (शिर्डी) आणि नागपूर फ्लाइंग क्लब येथेही मोलाची कामगिरी बजावली आहे. आता त्यांच्या या अनुभवाचा फायदा अमरावती विभागातील सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी होणार आहे.

________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

पीर शेखसाहेब ऊरूसनिमित्त शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन

Next Post

सर्पदंश लसीसाठी ५० लाखाची तरतूद, दीड कोटी निधीची मागणी करणार .. सभापती केदार सावंत

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सर्पदंश लसीसाठी ५० लाखाची तरतूद,  दीड कोटी निधीची मागणी करणार .. सभापती केदार सावंत

सर्पदंश लसीसाठी ५० लाखाची तरतूद, दीड कोटी निधीची मागणी करणार .. सभापती केदार सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

“बाप्पा”च्या मिरवणुकीत खाकीचा जल्लोष!

September 25, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

“२५ वर्षा”नंतर पोलिसांनी धरला हलगीच्या तालावर ठेका

September 25, 2026

September 25, 2026
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली

पाणी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्ती दान करा… जिल्हाधिकारी

September 25, 2026
गांधी जयंती नंतर SIR सुनावणी घेण्याची मागणी

गांधी जयंती नंतर SIR सुनावणी घेण्याची मागणी

September 25, 2026
सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

सीईओंच्या दालनासमोर ठेकेदारांचा ठिय्या

September 22, 2026
विद्यापीठातील  सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर”  नाव द्या

विद्यापीठातील सिनेट सभागृहाला “सुभेदार मल्हारराव होळकर” नाव द्या

September 22, 2026
बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

बालकांच्या संगोपनात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची..

September 22, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

139964

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697