Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सर्पदंश लसीसाठी ५० लाखाची तरतूद, दीड कोटी निधीची मागणी करणार .. सभापती केदार सावंत

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 8, 2026
in सोलापूर
0
सर्पदंश लसीसाठी ५० लाखाची तरतूद,  दीड कोटी निधीची मागणी करणार .. सभापती केदार सावंत
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

झेडपी आरोग्य समिती समिती सभा संपन्न

सोलापूर – सर्पदंश लसी साठी ५० लक्ष रुपये तरतुद करण्यात आली असून आणखी दीड कोटींची मागणी करणार असल्याची माहीती आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आरोग्य समिती सभा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार – सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी समितीच्या सदस्या सोनाली कडते, संगिता दुधाळ, शोभा खटकाळे, सविता कोकाटे, सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार उपस्थित होते.

या सभेमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. सभापती  केदार सावंत यांनी पारदर्शक पध्दतीने आरोग्य विभागाचा कारभार झाला पाहिजे. तुमच्या अडचणी असतील तर सांगा त्यावर मार्ग काढला जाईल. ग्रामीण भागात पाणी गुणवत्ता चांगली राहणे साठी प्रयत्न करा. वेळेत पाणी नमुने तपासणी झाली पाहिजे. सध्या पाणी टंचाई लक्षात घेता गुणवत्तेकडे लक्ष द्या. तसेच ग्रामीण भागातील जनतेला श्वानदंश लस मिळाली पाहीजे. त्यासाठी जि.प.सेस मधुन ५० लाख तरतुद आहे परंतू या साठी  दिड कोटी तरतुद अपेक्षित आहे. त्याबाबत पाठपुरावा करुन निधी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.आरोग्याच्या दृष्ट्रीने चांगले काम कसे होईल याचा आराखडा तयार करा. अशा सुचना सभापती केदार सावंत यांनी केल्या.
प्रत्येक प्रा.आ.केंद्राला भविष्यात सोलर सिस्टिम बसवण्याबाबतचे काय करता येईल याबाबतचे नियोजन करणे बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना केल्या.अपंग मुलांचा सर्व्हे करुन अपंग असलेल्या सर्वांना सर्टिफिकेट मिळणेबावत तालुकास्तरावर कॅम्प घेणेबाबत लवकर तालुका आरोग्य अधिकारी यांनी कार्यवाही करावी अशा सुचना दिल्या.
सभापती  केदार सावंत यांनी आरोग्य समिती सभा अधुन मधुन तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात यावी अशी सुचना मांडली. गेल्या दोन वर्षापासुन तालुका आरोग्य अधिकारी यांचे वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च केलेल्या गोष्टींचे बीले प्रलंबित  आहेत. त्याबाबत समन्वयातून मार्ग काढण्याबाबत व ती बीले त्यांना मिळणेबाबत आवश्यक त्या निधीसाठी पाठपुरावा करणेच्या सुचना दिल्या .
जि.प.सेस च्या २०२६-२७ च्या मुळ ५१०.०८ लक्षच्या मुळ अंदाजपत्रकाच्या विषयास शिफारस मान्यता घेण्यात आली.जिल्हा नियोजन समितीला सादर केलेल्या मंजूर आराखडयास शिफारस करणेसाठी मान्यता घेण्यात आली.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

अरूण डोंगरे अमरावतीचे ‘राज्य सेवा हक्क आयुक्त’

Next Post

स्वगणना करून जिल्हाधिकार्‍यांनी केले नागरीकांना आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
स्वगणना करून जिल्हाधिकार्‍यांनी केले नागरीकांना आवाहन

स्वगणना करून जिल्हाधिकार्‍यांनी केले नागरीकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक