Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 4, 2026
in सोलापूर
0
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर 
थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी  पूनम गेट ते सह प्रादेशिक साखर कार्यालय दरम्‍यान अर्धनग्न मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी साखर आयुक्‍त डॉ. संजय कोलते यांच्‍याशी फोनद्वारे संपर्क साधून गोकूळ साखर कारखान्‍यांकडील थकीत बिलासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी, अशी मागणी केली. तसे आश्वासन साखर आयुक्‍त कोलते यांनी दिल्‍यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी सह प्रादेशिक साखर कार्यालय येथील आंदोलन मागे घेतले. मात्र, जोपर्यंत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु ठेवणार असल्‍याचे सांगितले.
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्‍यांकडील थकीत ऊसबिलासाठी धाराशिव व सोलापूर जिल्‍ह्यातील शेकडो शेतकरी गेल्‍या अकरा दिवसापासून जिल्‍हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्‍या अकराव्‍या दिवशी म्‍हणजेच गुरुवारी शेतकऱ्यांनी पूनम गेट ते सह प्रादेशिक साखर कार्यालय अर्धनग्र मोर्चा काढून सह प्रादेशिक साखर कार्यालय येथे दोन तास ठिय्या मारला.
त्‍यानंतर पोलीसांनी सह प्रादेशिक साखर आयुक्‍त कार्यालयातील प्रभारी साखर सहसंचालक आबासाहेब गावडे यांच्‍याना बोलावून आंदोलकांशी चर्चा करायला लावली. त्‍यावेळी प्रभारी साखर सहसंचालक गावडे यांनी थेट साखर आयुक्‍त कोलते यांच्‍याशी फोनद्वारे संपर्क साधून शेतकरी आंदोलक नेता ॲड. अमोल पाटील, अरविंद गोडके, माजी पंचायत समिती विरोध पक्षनेता बाळासाहेब मोरे यांच्‍याशी बोलणे करुन दिले. आयुक्‍तांना आश्वासन दिल्‍यानंतर आंदोलकांनी सह प्रादेशिक साखर कार्यालय येथील आंदोलन मागे घेतले .


—-
चौकट

….
परवाना नसताना कारखाना चालला कसा : 

…,
साखर आयुक्‍त कार्यालयाचा गाळप परवाना नसताना गोकूळ साखर कारखान्‍यांने तीन लाखांपेक्षा जास्‍त टन ऊसाचे गाळप कसे केले. सह प्रादेशिक साखर कार्यालयाने वेळीच कारखान्‍यांवर कारवाई केली असती तर शेतकऱ्यांचे बिले थकले नसते. बिले थकण्यास सह प्रादेशिक साखर कार्यालयच जबाबदार असल्‍याचा दावा शेतकरी आंदोलन नेते ॲड. अमोल पाटील यांनी केला आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

 

Previous Post

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

Next Post

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई - विभागीय आयुक्त शितल तेली - उगले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136470

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697