Thursday, June 4, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 4, 2026
in सोलापूर
0
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

दक्षिण सोलापूर  : समाजहित आणि लोककल्याणाची जपणूक करत दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परीषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त आहेरवाडी येथे विविध सामाजिक, आरोग्यविषयक व जनकल्याणकारी उपक्रम उत्साहात राबविण्यात आले . बापू-दादा-सावकार बहुउद्देशीय व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, एस.टी. मोफत प्रवास कार्ड नोंदणी आदी विविध उपयुक्त शिबिरांमुळे आहेरवाडी परिसर दिवसभर समाजसेवेच्या रंगात न्हाऊन निघाला. सभापती चिवडशेट्टी सावकार यांच्या वाढदिवसाच्या रक्तदान शिबिरात १७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती आणि भाजप युवा नेते डाॅ. अनिल हवीनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेचे कौतुक करत समाजासाठी प्रेरणादायी कार्य असल्याचे गौरवोद्गार काढले.
कडक उन्हाची पर्वा न करता तब्बल १७७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदानाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
यावेळी बापू – दादा – सावकार – बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी, मल्लिनाथ चिवडशेट्टी, कल्याणी कोकरे, श्रीकांत चिवडशेट्टी, जकण्णा कोरे, रेवणसिद्ध पटणे, जगन्नाथ गायकवाड, तिल्हेळचे उपसरपंच सिद्धराम धायगोडे, केदार हिरापूरे, श्रीशैल व्हनमाने, प्रभाकर दिंडोरे, शशिकांत पाटील, परमेश्वर हिप्परगे, पंडित पाटील, नागनाथ बोरुटे, विशाल माने, राजशेखर कुंभार, शिवराज कोरे, सिद्धेश्वर पाटील, संतोष हक्के, सिद्धेश्वर कोटाणे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, नागनाथ रामपुरे, सोमनाथ देशमुख, विश्वनाथ आलूरे, शौकत इमानदार, राजशेखर बिराजदार, मल्लिकार्जुन यळसंगे, परशुराम आटकर, सिद्धाराम सासवे तसेच दमानी ब्लड बँकेचे अधिकारी अभय कुलकर्णी, अमरजा थिटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सत्संग व प्रवचन कार्यक्रमालाही मोठी गर्दी झाली होती. बेळगाव येथील प्रवचनकारांनी अध्यात्म, संस्कार, समाजसेवा, नैतिक मूल्ये आणि सकारात्मक जीवनशैली यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले.

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

Next Post

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

June 2, 2026
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

June 2, 2026
पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

June 1, 2026
विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

June 1, 2026
परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

May 31, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

102024

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697