Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

रविवार 28 जून रोजी परीक्षा घेण्यात येणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 4, 2026
in सोलापूर
0
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे

– निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

सोलापूर :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2026 रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यभर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 47 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून 28 हजार 298 परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. तरी ही परीक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी योग्य नियोजन करावे व आवश्यक मनुष्यबळ सर्व शासकीय विभागातून उपलब्ध करून घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महाराष्ट्र पात्रता परीक्षा 2026 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत, कोषागार अधिकारी रणजीत कदम यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले की, या परीक्षेसाठी किमान चार ते पाच भरारी पथकाची नियुक्ती करा. 47 परीक्षा केंद्रावर पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवावा. परीक्षा पेपर कोषागार कार्यालयात व्यवस्थित ठेवून प्रत्येक परीक्षा केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक बंदोबस्त द्यावा. या परीक्षेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ यांची नियुक्ती आदेश काढावे तसेच अतिरिक्त दहा ते पंधरा टक्के मनुष्यबळ रिझर्व ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.


प्रारंभी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही रविवार 28 जून रोजी सोलापूर शहरातील 47 केंद्रावर परीक्षा होणार असून पेपर क्रमांक 1 सकाळी 10:30 ते 1:00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 12 हजार 261 परीक्षार्थी बसणार आहेत.पेपर क्रमांक 2 दुपारी 2:30 ते 5:00 या वेळेत होईल. या पेपरसाठी 16 हजार 37 परीक्षार्थी बसणार आहेत. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

______________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

'गोकुळ'च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136470

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697