Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 1, 2026
in सोलापूर
0
पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन
0
SHARES
319
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पत्नीवियोगाने लाड गुरुजींचे निधन

मंद्रूप..

सध्याच्या युगात विविध कारणामीळे विवाह झाल्यानंतर सहा महिन्यातच घटस्फोट घेणार्‍या पती पत्नीची संख्या वाढत आहे. विविध कारणामुळे न्यायालयात पती पत्नी एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. वेगवेगळ्या कारणामुळे पती व पत्नी यांच्यात वाद व भांडणे होत असताना मंद्रुपमध्ये मात्र सोमवारी पत्नीच्या निधनाची माहिती कळताच पतीचेही पत्नीवियोगात प्राणज्योत मालावली. त्यामुळे पती पत्नी म्हणून गुण्यागोविंदाने राहणार्‍या लाडर दांपत्याच्या निधनाने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 मंद्रूप येथे सोमवारी सकाळी पद्मावती रामण्णा लाडर वय ७५ यांचे आजारामुळे निधन झाले. त्यानंतर घरातच आजारी असणारे त्यांचे पती रामण्णा लाडर वय ८६ यांना पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच त्यांचीही पत्नीवियोगाने प्राणज्योत मालावली. त्यामुळे एकाच दिवशी व एकाच वेळी पती पत्नीचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लाडर कुटुंब मूळचे कर्नाटकामधील जिगजिणीचे रहिवाशी. त्या भागातच रामण्णा लाडर यांनी शिक्षकाची नोकरी करून निवृत्त झाल्यानंतर नातेवाईक म्हणून मंद्रूपमध्ये स्थायिक झाले. त्यानंतर लाड गुरूजी म्हणून ते भजन, किर्तन व पूजाअर्चा यामध्ये हिरीरीने भाग घ्यायचे. हनुमान मंदिरात भजन व किर्तन करायचे. तसेच दत्त मंदिराचे पुजारी म्हणूनही त्यांची मंद्रूपमध्ये परीचय होता. आठवड्यापूर्वी फरशीवरून पाय घसरून पडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. तर त्यांची पत्नी पद्मावती या वृध्दापकाळामुळे आजारी होत्या. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले होते. सोमवारी सकाळी पद्मावती यांचे आजारामुळे निधन झाले. त्यामुळे घरात पाहुणे व नातेवाईकांची वर्दळ पाहून लाड गुरूजीनी विचारणा केली. त्यावेळी पत्नीचे निधन झाल्याचे कळताच लाड गुरूजींचेही प्राणज्योत मालावली. सायंकाळी मंद्रुप येथील हिंदु स्म्शानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात आले . पुजारी व अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वांच्या आवडीचे लाड गुरुजी व त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे मंद्रूप परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहीत मुलगा, दोन मुली , सुना व नातवंडे असा परिवार आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136470

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697